Pune Fire : पुण्यात मेणबत्ती फॅक्टरीत 7 जणांचा जागीच झाला कोळसा, काय घडलं?
पिंपरी चिंचवडमध्ये बर्थडे केकवर लावण्यात येणाऱ्या स्पार्कलिंग कँडलची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली होती. सुरुवातीला फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली होती, त्यानंतर ही आग पसरून फॅक्टरीत पोहोचली.
ADVERTISEMENT
Pune Factory Fire 7 Women Dead : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधून (Pimpari-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मेणबत्तीच्या फॅक्टरीला (sparkle candle company fire) भीषण लागल्याची घटना घडली. या आगीची भीषणता इतकी होती की, काही मिनिटांतच संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. या आगीत होरपळून सात महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने सध्या पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. (pune news pimpri chinchwad sparkle candle company fire 7 women dead shocking pune story)
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवडमध्ये बर्थडे केकवर लावण्यात येणाऱ्या स्पार्कलिंग कँडलची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली होती. सुरुवातीला फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली होती, त्यानंतर ही आग पसरून फॅक्टरीत पोहोचली. जिथे 15 ते 20 कर्मचारी आधीच कंपनीत काम करत होते. यावेळी या आगीत होरपळून 7 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर 11 जण या आगीत जखमी झाले आहेत. या 11 पैकी काही कामगारांची प्रकृती फार चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुबियांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा : MLA Disqualification : ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?
दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत मेणबत्तीची फॅक्टरी जळून खाक झाली आहे. फॅक्टरीत असलेले साहित्य देखील या आगीत जळाले आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? याबाबतचा तपास आता अग्निशमन दल करते आहे. या तपासात आता फॅक्टरीला आग लागण्या मागचे काय कारण समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : BJP : “…तीच भूमिका प्रफुल पटेलांबद्दलही असती”, ठाकरेंवर पलटवार, भाजपने सोडलं मौन
दरम्यान या दुर्घटनेत मृतांची ओळख पटवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करणे हाच एकमेव पर्याय सध्या उरली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT