Pune Accident : 'माझा बाप बिल्डर असता...?', पुण्यातील निबंध स्पर्धेची चर्चा! कोण आहे आयोजक?
Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणावरून वातावरण तापलं असताना युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला 11 हजार 111 रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.या स्पर्धेत 17 वर्ष 18 महिने आणि 58 वर्ष वयोगटाचे नागरीक भाग घेऊ शकतात.
ADVERTISEMENT
Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. दोन जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीला अवघ्या 14 तासात मिळालेला जामीन आणि कोर्टाने निंबध लिहिण्याची दिलेली शिक्षा, यावरून हे प्रकरण संपूर्ण देशात प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विषय लावून धरल्यामुळे अनेकांवर कारवाई झाली होती. यानंतर आता पुणे युवक काँग्रेसकडून (Youth Congress) राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे (Essay Competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे. (pune porsche car accident youth congress organised state level essay competition ravindra dhangekar congress)
पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणावरून वातावरण तापलं असताना युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला 11 हजार 111 रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. दुसरा क्रमांक मिळवणाऱ्याला 7 हजार 777 रूपये बक्षीस देण्यात येईल. तिसऱ्या येणाऱ्या उमेदवाराला 5 हजार 555 रूपये बक्षीस दिले जाईल. आणि उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी 1 हजार रूपये बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचे विषय वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
निबंध स्पर्धेचे विषय
- माजी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडीज किंवा इतर.)
- दारूचे दुष्परीणाम
- नियम पाळा, अपघात टाळा,अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे.
- आजची तरूण पिढी अन् व्यसनाधीनता
- माझा बाप बिल्डर असता तर?
- रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे?
- मी पोलीस अधिकारी झालो तर..?
- भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का?
- अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण?
- माझ्या स्वप्नातील पुणे शहर/ असं असावं माझं पुणे शहर
या स्पर्धेत 17 वर्ष 18 महिने आणि 58 वर्ष वयोगटाचे नागरीक भाग घेऊ शकतात. तर निबंध लिहिण्याची शब्द मर्यादा 300 ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या भागात अपघात झाला त्याच कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या संबंधित पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान आता या स्पर्धेला पुणेकर कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT