Ramoji Rao Death: रामोजी फिल्म सिटीतून काल्पनिक जग सत्यात उतरवणाऱ्या रामोजी राव यांचं निधन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ramoji Rao Passes Away: ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज 8 जून रोजी पहाटे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते आणि अनेक दिवसांपासून आजारी होते. शनिवारी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. तसंच श्वसनाचाही त्रास होत होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'रामोजी राव यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. भारतीय माध्यमांमध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे त्यांनी माध्यम आणि मनोरंजन विश्वात नावीन्य आणि उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : विश्वचषकात नेमकं चाललंय तरी काय?, 'या' बलाढ्य टीमचा पराभव

पुढे PM मोदी म्हणाले की, 'रामोजीरावांना भारताच्या विकासाची खूप तळमळ होती. मी भाग्यवान आहे की मला त्यांना भेटण्याच्या आणि बोलण्याच्या अनेक संधी मिळाल्या. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांसाठी माझ्या संवेदना आहेत.'

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'तेलुगू मीडियामध्ये त्यांचं दिग्गज नाव होतं. रामोजी राव यांच्या निधनाने मीडिया आणि चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि हितचिंतकांसोबत माझ्या संवेदना आहेत.'

ADVERTISEMENT

हेही वाचा : IND vs PAK: भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे पाहता येणार? 

रामोजी राव कोण होते?

रामोजी राव हे एक यशस्वी उद्योजक, चित्रपट निर्माते आणि मीडिया टायकून होते. ते तेलुगू मीडियातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 

ADVERTISEMENT

पद्मविभूषण पुरस्करकृत रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपमध्ये जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे.

हेही वाचा : कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई

रामोजी यांच्या इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये मार्गदर्शी चिटफंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कालांजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT