Ratnagiri :विसर्जन मिरवणुकीला गालबोट! भाविक नाचत असताचा टेम्पो घुसला, अन्…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ratanagiri accident tempo break fell two dies and 5 injured ganapati visarjan
ratanagiri accident tempo break fell two dies and 5 injured ganapati visarjan
social share
google news

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालूक्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे.त्याचं झालं असं की पाचेरी आगारातून विसर्जन मिरवणूक रस्त्यावर जात असताना टेम्पो थेट मिरवणूकीत घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन जणाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. कोमल नारायण भुवड (वय 17) आणि टेम्पो चालक दीपक लक्ष्मण भुवड (वय 48) या दोघांचा दुदैवी मृत्यू झालाय, तर पाच जण गंभीर जखमी आहे. ही सर्व मंडळी पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारी होती. या घटनेने रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे. (ratanagiri accident tempo break fell two dies and 5 injured ganapati visarjan)

ADVERTISEMENT

गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी टेम्पो व दोन गणपती तसेच समोर ड्रायव्हर बरोबर एक 17 वर्षाची मुलगी कोमल भुवड बसली होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना 207 या टेम्पोचे ब्रेक फेल झाला आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. मात्र हा प्रकार टेम्पो चालकाच्या लक्षात येताच त्याने टेम्पोमधून उडी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या एकट्याने काय तो थांबला नाही आणि अंगावरून गेला. इतकंच नाही तर समोर नाचत असलेल्या भाविकांनाही या टेम्पोची जोरदार धडक बसली.

हे ही वाचा : Ganpati Visarjan 2023: जीव मुठीत धरून गणपती बाप्पाचे विसर्जन, नेमकं काय घडलं?

या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या 17 वर्षीय मुलीचा डोक्याला गंभीर दुखावत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यामधील जखमी झालेल्या चालक दीपक भुवड याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्याला डेरवण येथे हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेत कोमल नारायण भुवड (वय 17) आणि टेम्पो चालक दीपक लक्ष्मण भुवड (वय 48) या दोघांचा दुदैवी मृत्यू झालाय, तर पाच जण गंभीर जखमी आहे.या सगळ्या घटनेचे वृत्त कळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : World Cup साठी टीम इंडियाकडून फायनल स्क्वॉड जाहीर, ‘या’ खेळाडूचा पत्ता कट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT