RBI : 500 रुपयांच्या 88,000 कोटींच्या नोटा छापखान्यातून खरंच गायब झाल्यात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Did Rs 500 notes worth Rs 88,000 crore really go missing? RBI) rejected report.
Did Rs 500 notes worth Rs 88,000 crore really go missing? RBI) rejected report.
social share
google news

RBI on 500 Notes : नाशिक, देवास आणि बंगळुरूतील छापखान्यांतून पाच रुपयांच्या 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पोहोचण्याआधीच गायब झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सगळीकडे या वृत्ताची चर्चा असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बातमीबद्दल खुलासा केला आहे. (RBI Latest News)

अलिकडेच एका रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला की, 88,032.5 कोटी रुपयांच्या 500 रुपयांच्या नव्या नोटा देशाच्या अर्थव्यवस्थेतून गुढपणे गायब झाल्या आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. रिपोर्टनुसार, माहितीच्या अधिकारात (आरटीआय) दिलेल्या उत्तरात असे दिसून आले की नाशिकमधील करन्सी नोट प्रेसद्वारे 500 रुपयांच्या 375.450 दशलक्ष नोटा नवीन डिझाइनसह छापल्या गेल्या. आरबीआयच्या नोंदीवरून असे दिसून आले आहे की, एप्रिल 2015 ते डिसेंबर 2016 दरम्यान केंद्रीय बँकेला केवळ 345,000 दशलक्ष छापील नोटा मिळाल्या आहेत.

माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला, आरबीआयने काय म्हटलंय?

या प्रकरणावर रिझर्व्ह बँकेने खुलासा केला आहे. माहितीचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला गेला आहे. रिझर्व्ह बँककडे प्रिंटिंग प्रेसमधून पुरवण्यात आलेल्या सर्व बँक नोटांच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात. केंद्रीय बँकेने असंही म्हटलं आहे की, मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांमध्ये 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं सांगण्यात येत आहे, पण हे योग्य नाही. रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, हे वृत्त माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत प्रिंटिंग प्रेसमधून गोळा केलेल्या माहितीच्या चुकीच्या अर्थावर आधारित आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Shishir Shinde : ठाकरेंची आणखी एका नेत्याने सोडली साथ, कारणही सांगितलं?

नोटांसाठी सुरक्षित यंत्रणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, हे लक्षात घ्यायला हवे की, प्रिंटिंग प्रेसमधून आरबीआयला पुरवलेल्या सर्व बँक नोटांचा योग्य हिशोब ठेवला जातो. नोटांची छपाई, साठा आणि वितरण यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रोटोकॉलसह मुद्रित आणि पुरवठा केलेल्या बँक नोटांचा ताळमेळ घालण्यासाठी आरबीआयकडे सुरक्षित आणि मजबूत यंत्रणा आहे. त्यामुळे लोकांना विनंती आहे की, अशा प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन आरबीआयने केले आहे.

रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं?

88,032.50 कोटी रुपयांच्या 500 रुपयांच्या नोटा गहाळ झाल्याचा दावा आरटीआयमधील उत्तराच्या हवाल्याने काही रिपोर्टमधून करण्यात आला. 500 रुपयांच्या 8,810.65 दशलक्ष नवीन नोटा अर्थव्यवस्थेत आणण्यात आल्या. आरटीआयनुसार रिझर्व्ह बँकेला केवळ 7260 दशलक्ष नोटा मिळाल्या आहेत. आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेतून 1760.65 दशलक्ष नोटा गायब आहेत, ज्यांची किंमत 88,032.50 कोटी रुपये आहे. सध्या भारतात नोटांची छपाई करणारे तीनच छपाईखाने आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलेलं, फडणवीसांना माहितीही नव्हतं’, कोणी केला गौप्यस्फोट?

2016-17 मध्ये नाशिक येथील प्रिंटिंग प्रेसमधून 1662 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात आल्या होत्या. बंगळुरू युनिटकडून 5195.65 दशलक्ष नोटा आणि देवासमधून 1953 दशलक्ष नोटांचा रिझर्व्ह बँकेला पुरवठा करण्यात आला होता. या तिन्हींसह 8810.65 दशलक्ष नोटा झाल्या. यापैकी फक्त 7260 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला मिळाल्या. असं असलं तरी नोटा गहाळ झाल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सर्व नोटांचे संपूर्ण नोंदी आपल्याकडे असल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT