Pune : दोनच दिवसापूर्वी लग्न, देवदर्शनावरून परतताना नवरा-बायकोचा दुदैर्वी अंत
Pune Accident : पुणे जिल्ह्यातील सासवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या दोनच दिवसांनी देवदर्शन करून परतताना नवविवाहित जोडप्याची रिक्षा थेट विहिरीत कोसळली होती. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
Pune Accident : पुणे जिल्ह्यातील सासवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या दोनच दिवसांनी देवदर्शन करून परतताना नवविवाहित जोडप्याची रिक्षा थेट विहिरीत कोसळली होती. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18) आणि श्रावणी संदीप शेलार (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने विहिरीत कोसळून हा अपघात घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (rickshaw fell into well while new married couple and gird dies pune saswad story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी येथील शेलार कुटुंबात या नवविवाहित जोडप्याचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हे कुटुंब जेजुरीला खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन करून परतत असताना सासवडजवळ त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे रिक्षा थेट विहिरीत कोसळली होती.
हे ही वाचा : MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?
या रिक्षातून नवविवाहित जोडप्यासह चालकासहीत दोन जण प्रवास करत होते.यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले, तर नवविवाहित जोडप्यासह एकीचा मृत्यू झाला.रिक्षा विहिरीत पडल्यानंतर दोघांनी मदतीसाठी हाक मारली. सुदैवाने सकाळी व्यायामाला बाहेर पडलेल्या लोकांना ही हात ऐकली आणि दोघांना वाचवण्यात यश आले. रिक्षात बसलेल्या आदित्य मधुकर घोलप आणि संगीता संदीप शेलार यांचा जीव स्थानिक लोकांच्या मदतीने वाचला आहे. तर रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18) या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. यासोबत श्रावणी संदीप शेलार (वय 17) या तरूणीचा देखील मृत्यू झाला आहे.
हे वाचलं का?
त्यामुळे लग्नानंतर सुखी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्याचा विवाह अवघ्या दोनच दिवसांत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : Garware Club Election: शरद पवारांना धक्का.. ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT