सप्टेंबरपासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
Rule change 1st September : सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर आणि एफडीचे नियम समाविष्ट आहेत. हे बदल तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (डीए वाढ) भेट देऊ शकते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलतात
या नियमांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो
सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत?
Rule change 1st September : प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलत असतात. या नियम बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होत असतो. जसे एलपीजी (LPG), सीएनजीचे (CNG) दर, बँके संबंधीत नियम अशा अनेक गोष्टीचे नियम बदलत असतात. त्यामुळे आता 1 सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत. या नियम बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात. ( rule change from 1st september 2023 lpg cylender adhar update credit card rules there rules are change from september)
सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर आणि एफडीचे नियम समाविष्ट आहेत. हे बदल तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (डीए वाढ) भेट देऊ शकते. त्यामुळे सप्टेंबरपासून काय काय बदलणार आहे? हे जाणून घेऊयात.
LPG च्या किंमतीत बदलणार
एलपीजी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आला आहे. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळी एलपीजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.
फेक कॉल
उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे. कारण ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि फेक मेसेजवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ट्रायने कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे.










