…म्हणून शरद पवारांना तुम्ही गोळ्या घालणार का?; सदाभाऊ खोतांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar sadabhau khot called sharad as devil. now khot said it happened because of sleep of tongue
Sharad Pawar sadabhau khot called sharad as devil. now khot said it happened because of sleep of tongue
social share
google news

Sadabhau Khot on Sharad Pawar : “जे घडत आहे, तो नियतीने उगवलेला सूड असून, शरद पवार हे सैतान आहेत”, अशी टीका करणारे माजी आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी यावर खुलासा केला. मात्र, सदाभाऊ खोतांनी खुलासा करताना केलेल्या विधानंही चर्चेत आलं आहे. (Sadabhau Khot Explanation on controversial Remarks about Sharad Pawar)

दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांना सदाभाऊ खोत सैतान म्हणाले. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली. यावर आता सदाभाऊ खोातांनी खुलासा केला.

वाचा >> 602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?

सदाभाऊ खोत काय बोलले?

शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल बोलताना सदाभाऊ म्हणाले, “ज्यावेळी समृद्धी महामार्गावर अपघात झाला, 25 लोक मेले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, देवेंद्रवासी झाले. त्यांना तसं म्हणायचं होतं का? नव्हतं म्हणायचं. ते कैलासवासी झाले. देवाज्ञा झाली, असं बोलायचं असेल, पण अनावधानाने गेला शब्द… म्हणून तुम्ही काय गोळ्या घालणार आहात का?”, असा सवाल उलट सवाल त्यांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शरद पवार सैतान’, खोत नेमकं काय बोलले होते?

सदाभाऊ खोत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाबद्दल बोलताना म्हणाले होते की, “शरद पवारांचा राजकीय उदय झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. शरद पवारांच्या सरदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांची खळी लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला, तेच सरदार आता सैरभैर पळत आहेत.”

वाचा >> ’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला

“इथून पुढे हा सैतान परत गावगाड्याकडे येणार नाही व पुन्हा नवे सरदार तयार करता कामा नये, यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ही लढाई लढावी लागणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांची मोळी बांधून बिंडा बांधला आहे. मात्र, हा बिंडा आता विस्कटला आहे. या गवताच्या पेंड्या सूटल्या जातील व या गवताच्या काड्या वाळून मोडून जातील”, असा अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली होती.

ADVERTISEMENT

तेच पाप फेडावे लागत आहे…

“यापूर्वी पुण्यात काका मला वाचवा अशी हाक महाराष्ट्राने ऐकली होती. मात्र आता पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक आता महाराष्ट्र ऐकत आहे. ही अवस्था त्यांच्या कर्तृत्वामुळे झाली असून, शरद पवार यांना खऱ्या अर्थाने आता पाप फेडावे लागत आहे. जैसी करणी वैसी भरणी… जे घडत आहे ते नियतीने आणि काळाने शरद पवार यांच्यावर उगवलेला सूड आहे”, असंही सदाभाऊ खोत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT