Thane: समृद्धी महामार्गावर पूल कोसळला, 17 जागीच ठार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Thane samruddhi mahamarg accident today : 17 workers died on the spot
Thane samruddhi mahamarg accident today : 17 workers died on the spot
social share
google news

Samruddhi mahamarg accident today: ठाणे जिल्ह्यात अजून निर्माणधीन असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एक भीषण दुर्घटना घडली आहे. निर्माणधीन असलेला पूल कोसळून झालेल्या भयंकर अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. (14 died on Mumbai Nagpur samruddhi expressway)

बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. उर्वरित मार्गाचं काम सुरु आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काम सुरु असतानाच दुर्दैवी घटना घडली.

समृद्धी महामार्गावर पूल कसा कोसळला?

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर उभारण्यात आलेल्या पुलावर मोठा क्रेन कोसळला. पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार दाबले गेले. सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तातडीने मदत व शोध मोहीम हाती घेण्यात आली. जवानांना ढिगाऱ्याखाली 14 जणांचे मृतदेह आढळून आले. तर 3 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही ढिगारा हटवण्याचं काम सुरूच असून 6 जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा >> Sambhaji Bhide: गांधी, फुले ते साईबाबा, भिडेंनी कुणालाच सोडलेलं नाही, तरीही…

under construction Samruddhi Expressway in which one Crane fell on Slab of bridge in thane

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केलीये. “शहापूर, ठाणे येथे गर्डर कोसळून मोठी जीवितहानी झाली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद असून,या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT