Kalyan: खळबळ उडवून देणारी बातमी, कल्याण रेल्वे स्थानकात सापडले तब्बल 54 डिटोनेटर्स!

ADVERTISEMENT

कल्याण रेल्वे स्थानकात सापडले 54 डिटोनेटर्स
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले 54 डिटोनेटर्स
social share
google news

Detonators found in Kalyan railway station: कल्याण: लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघे काही दिवस उरलेले असताना राज्यात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. मुंबईनजीच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल 54 डिटोनेटर्स (स्फोटकं) सापडली असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. (shocking news as many as 54 detonators found in kalyan railway station)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आज (21 फेब्रुवारी) आज दुपारच्या सुमारास तब्बल 54 डिटोनेटर्स सापडले आहेत. कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील अत्यंत गर्दीचं असं ठिकाण आहे. त्यामुळे येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात डिटोनेटर्स सापडल्याने पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दोन खोक्यांमध्ये भरलेली ही स्फोटकं आता कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत.  

एकूण दोन खोके हे प्लॅटफॉर्मवर बेवारस अवस्थेत आढळून आले. ज्यामध्ये स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याचं आढूळून आलं. रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने याबाबतची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

ज्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे आणि त्यांच्या टीमने तातडीने रेल्वे स्थानकात धाव घेऊन या दोन्ही खोक्यांची तपासणी केली. ज्यानंतर त्यात डिटोनेटर्स असल्याचं पोलिसांना आढळून आलं.  

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं आणि त्यांच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही सर्व डिटोनेटर्स तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतली. 

ADVERTISEMENT

आता या घटनेनंतर ही स्फोटके रेल्वे स्थानकात कशी आली? ती नेमकी कोणी आणली आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे. या गोष्टी शोधण्याचं मोठं आव्हान कल्याण लोहमार्ग पोलिसांसमोर आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या घटनेमुळे प्रशासन देखील अलर्टवर गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकही स्थापन करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

डिटोनेटर्स म्हणजे काय?

डिटोनेटर्स ही तीव्र स्वरुपाची स्फोटकं असतात. पण यांचा वापर हा शक्यतो दगड खाणींच्या सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदणं यासाठी वापरली जातात. अशा क्षमतेची आहेत. ती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतात. पण या डिटोनेटर्सचा आपोआप स्फोट होत नाही, कारण त्यांना वात असते.

हे ही वाचा>> बोटं तोडली अन्...; तरुणाच्या हत्येनं उल्हासनगर हादरले!

मात्र, असं असलं तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं ती देखील सर्वाधिक गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकात सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याबाबत प्राथमिक माहिती देताना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील असं म्हणाले की, 'ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा.' 

पण तरीही आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT