Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

मुंबई तक

Ganpat Gaikwad Inside Story: भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यातील वादाची नेमकी इनसाईड स्टोरी काय ते आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story
bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story
social share
google news

Ganpat Gaikwad firing inside Story: निलेश झालटे, उल्हासनगर: उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. कल्याण, ठाण्यात भाजप आणि शिंदे गटात वाद तसा नवा नाही. मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजप आमदारानं चक्क गोळीबार केल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. (bjp mla ganpat gaikwad firing in police station what exactly is the land ownership dispute with shiv sena leader mahesh gaikwad inside story)

आता यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, शिवाय खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात सखोल चौकशी करुन कारवाईबाबत आश्वासन दिलंय. महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर आहेत तर राहुल पाटीलवर आयसीयूमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर आमदार महोदय जेलमध्ये पोहोचले आहेत. हे सगळं प्रकरण सुरु झालं ते एका जमिनीच्या वादातून. जमिनीच्या वादातून सुरु झालेलं हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारापर्यंत कसं पोहोचलं यामागची इनसाईड स्टोरी आपण जाणून घेऊयात.

तो वाद नेमका काय?

आधी गोळीबार कसा झाला त्याबाबत जाणून घेऊ… या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात दिसतंय की, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात महेश गायकवाड यांच्यासह पाच लोक समोर बसले होते. तिथं आमदार गणपत गायकवाड देखील होते. त्यांच्यात काही चर्चा होत असल्याचं दिसत होतं. अचानक काही वेळाने आमदार गणपत गायकवाड उठतात आणि बेछूट गोळीबार सुरु करतात. आणि धावपळ सुरु होते.

सगळेजण जीव वाचवण्यासाठी पळत सुटतात. गोळ्या संपेपर्यंत गणपत गायकवाड हे गोळीबार करत राहतात, त्यानंतर ते रिकाम्या झालेल्या बंदुकीने देखील महेश गायकवाड यांना मारहाण करतात, असं सीसीटीव्हीत दिसतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp