दोस्ताला मारहाण होत असलेली सहन होईना, वाचवायला गेला, जमावाने त्यालाही संपवलं; एकुलत्या एक मुलाचा करुण अंत
Crime news : सुलेबैलू परिसरात कोचिंग क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. आपल्या मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला वाचवायला गेलेल्या संकेत नावाच्या विद्यार्थ्याची जमावाने निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोस्ताला मारहाण होत असलेली सहन होईना, वाचवायला गेला
जमावाने त्यालाही संपवलं; एकुलत्या एक मुलाचा करुण अंत
Crime News : 'मैत्रीसाठी काय पण' असं नेहमी बोललं जातं. मात्र, कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात हे एका मुलाने करुन दाखवलंय. एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुलेबैलू परिसरात कोचिंग क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. आपल्या मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला वाचवायला गेलेल्या संकेत नावाच्या विद्यार्थ्याची जमावाने निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी संध्याकाळी सुलेबैलू येथील सरकारी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष जादा तास आयोजित करण्यात आल्या होता. वर्गातील तास संपवून विद्यार्थी जेव्हा शाळेबाहेर पडले, तेव्हा दबा धरून बसलेल्या काही तरुणांनी तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली. हल्लेखोरांनी सर्वात आधी गिरीश नावाच्या विद्यार्थ्याला लक्ष्य केले आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. गिरीशला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नसताना, त्याचा मित्र संकेत याने धैर्य दाखवत मध्ये पडण्याचा निर्णय घेतला.
मैत्री खातर पत्करले मरण
संकेत आणि गिरीश यांच्यात घट्ट मैत्री होती. आपल्या डोळ्यादेखत मित्राला मारहाण होत असल्याचे संकेतला सहन झाले नाही. तो निडरपणे गिरीशला वाचवण्यासाठी हल्लेखोरांच्या अंगावर धावून गेला. मात्र, संतापलेल्या जमावाने गिरीशला सोडून आपला मोर्चा संकेत कडे वळवला. हल्लेखोरांनी संकेतच्या छातीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर भीषण वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की संकेत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि बेशुद्ध झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हल्लेखोर तिथून पसार झाले.










