Kalyan: नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ बाळाचं नेमकं काय झालं?, 24 तास उलटले तरीही…

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

six month old baby who fell in drain between kalyan thakurli railway track not been found after 24 hours ndrf
six month old baby who fell in drain between kalyan thakurli railway track not been found after 24 hours ndrf
social share
google news

कल्याण: कल्याण आणि ठाकुर्ली (Kalyan-Thakurli) रेल्वे स्थानकादरम्यान एका नाल्यातून थेट खाडीमध्ये गेलेली सहा महिन्यांची चिमुकली (six month old baby) अद्यापही सापडलेली नाही. या दुर्दैवी घटनेला आता 24 तास उलटून गेलेले असून अद्यापही चिमुकली सापडलेली नाही. एनडीआरएफसह (NDRF)कल्याण-डोंबिवली अग्निशमन विभाग, तहसील आणि पोलिसांच्या पथकाचे ठाकुर्ली खाडी
परिसरात शोध मोहीम सुरू होती. मात्र, आता एनडीआरएफने आपले सर्च ऑपरेशन (Search Opreation) थांबविले आहे. तर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मात्र सर्च ऑपरेशन सुरूच आहे. कल्याण ते मुंब्रा खाडीपर्यंत हे सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस अर्चना दुसाने आणि मोहन खंदारे यांनी दिली. (six month old baby who fell in drain between kalyan thakurli railway track not been found after 24 hours ndrf has now stopped search operation video viral)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

काल (19 जुलै) मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम हा लोकल ट्रेनवर झाला होता. दरम्यान, कल्याणनजीक सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या लोकलमधून उतरून एक सहा महिन्याच्या बाळाला आई आणि आजोबा घेऊन पायी चालले असताना सहा महिन्याची चिमुकली ही नाल्यात पडली आणि थेट खाडीच्या प्रवाहातून वाहून गेली.

योगिता रुमाळे या मुंबईहून आपल्या सासऱ्यांसह सहा महिन्याच्या ऋषिकाला घेऊन प्रवास करत होती. मात्र, मुसळधार पावसामुळे आधीच ठप्प असलेल्या लोकल सेवेला अनेक ठिकाणी ट्रॅकवरील पाणी आणि सिग्नल मिळत नसल्याने लोकल एकाच ठिकाणी बराच काळ उभ्या होत्या. त्यातच योगिता ज्या लोकलमधून प्रवास करत होती ती लोकल कल्याण-ठाकुर्ली दरम्यान आली असता सिग्नल न मिळाल्याने बराच वेळ थांबली होती. त्यामुळे योगिता आणि योगिताच्या सासऱ्यांनी लोकलमधून उतरून पायी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

मात्र, ट्रेनच्या अगदी अरूंद बाजूने जात असताना योगिताचा तोल गेला.. त्यामुळे योगिताने हातातून निसटणारी चिमुकली ऋषिका ही सासऱ्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी सासऱ्यांच्या हातून देखील ऋषिका निसटली आणि थेट खाली नाल्यात पडली. यावेळी नाल्याच्या पाण्याला पावसामुळे मोठा प्रवाह असल्याने ऋषिका वाहत वाहत थेट खाडीमध्ये गेली.

हे ही वाचा >> ‘ते’ बाळ खरंच NDRF ला सापडलं?, रेल्वे ट्रॅकवरुन नाल्यात पडलेली चिमुकली बचावली?

दरम्यान यानंतर तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी येत सहा ते सात तास शोध घेतला. पण ऋषिका काही त्यांना सापडली नाही. त्यानंतर एनडीआरएफला पाचरण करण्यात आलं. मात्र, अंधार झाल्याने एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने शोध कार्य थांबवलं होतं. आज (20 जुलै) पुन्हा एकदा सकाळपासून ऋषिकाचं शोधकार्य एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आलं होतं. मात्र आता ते देखील एनडीआरएफकडून थांबविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

या संपूर्ण घटनेने ऋषिकाच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली आपल्या डोळ्यात देखत अशा पद्धतीने पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

‘ते’ बाळ खरंच वाचलं?

दरम्यान, लोकलमधून उतरताना एका महिलेच्या हातून तिचं बाळ निसटून थेट नाल्यातून वाहून गेल्याचं वृत्त प्रचंड व्हायरल झालं. कारण प्रत्यक्षदर्शींपैकी काही जणांनी हा प्रकार ट्रेनमधून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. ज्याचा व्हिडीओ हा अवघ्या काही मिनिटात प्रचंड व्हायरल झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याने प्रत्येकाने याबाबत हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अचानक सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशी माहिती व्हायरल झाली की, कल्याणजवळ नाल्यात पडलेलं बाळ हे सापडलं आहे. त्याला एनडीआरएफने वाचवलं आहे. अशा मेसेजसह एक फोटो देखील व्हायरल झाला. ज्यामध्ये एनडीआरएफच्या टीमने एका बाळाला हातात घेतलं असल्याचं पाहायला मिळत होतं. या फोटोमुळे अनेकांचा असा समज झाला की, कल्याणमध्ये वाहून गेलेलं ते बाळ सुखरुपपणे वाचलं.

हे ही वाचा >> Kalyan: हृदयद्रावक… लोकलमधून उतरताना 6 महिन्याचं बाळ हातातून निसटलं, नाल्यात गेलं वाहून

पण दुर्दैवाने असं घडलेलं नाही. कारण व्हायरल केला जाणारा फोटो हा साधारण वर्षभरापूर्वीचा आहे. जो मागील वर्षीचा पोलादपूरमधील असल्याचं समजतं आहे. पुरामधून एनडीआरएफने एका बाळाला वाचवलं होतं तो फोटो आता पुन्हा व्हायरल झाला.

दरम्यान याबाबत मुंबई Tak च्या प्रतिनिधीने डोंबिवली लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरक्षिक अर्चना दुसाने यांच्याशी याबाबत संपर्क साधून माहिती मिळविली. याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, दुर्दैवाने बाळ वाहून गेले आहे. जे अद्याप सापडू शकलेले नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT