नवी दिल्ली स्टेशनवर मृत्यूचं तांडव, चेंगराचेंगरीने 18 जणांचा घेतला बळी

मुंबई तक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

चेंगराचेंगरीने 18 जणांचा घेतला बळी
चेंगराचेंगरीने 18 जणांचा घेतला बळी
social share
google news

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (15 फेब्रुवारी) रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 14 आणि 15 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर कुंभमेळ्याला जाणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हे प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत होते. या घटनेतील 12 गंभीर जखमींवर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 9 महिला, 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 9 जण बिहारचे, 8 जण दिल्लीचे आणि एक हरियाणाचा आहे.

स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन निघण्याची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर आधीच गर्दी होती.

अधिकाऱ्याने सांगितले की, स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर देखील उपस्थित होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp