Govt Jobs : पदवीधरांसाठी 12 हजारहून अधिक पदांची भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई तक

SSC ने विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पदवीधर तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी चालून आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : पदवीधरांसाठी 12 हजारहून अधिक पदांची भरती

point

कसा कराल अर्ज?

Government Jobs : सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC)  'कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा 2026' (SSC CGL 2026) साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील गट ब आणि गट क अंतर्गत तब्बल 12, 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर (आयटी/सेंट्रल एक्साईज), सीबीआय/एनआयए मधील सब-इन्स्पेक्टर, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, टॅक्स असिस्टंट, ऑडिटर आणि पोस्टल असिस्टंट यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पदांचा समावेश आहे.

'इतका' असेल पगार

या सर्व पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना पदाच्या स्वरूपानुसार पे-लेव्हल 4 (रुपये 25,500 ते 81,100) पासून ते पे-लेव्हल 8 (रुपये 47,600 ते 1,51,100) पर्यंत अत्यंत आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही 1 ऑगस्ट 2026 या कट-ऑफ तारखेच्या आधारावर मोजली जाईल. वयोमर्यादेच्या सविस्तर अटी व सवलती अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : इंटेलिजन्स ब्युरोचा इशारा, अन् कॉकरोज जनता पार्टीचं X हँडल बंद, इन्स्टा अकाऊंटवरही कारवाई?

अर्जाची अंतिम तारीख

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून 21 मे पासून ती अधिकृतपणे सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयोगाच्या ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा 'my SSC' या मोबाईल ॲपद्वारे आपले अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची अंतिम मुदत 22 जून असेल, तर ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्यासाठी 23 जून पर्यंत वेळ देण्यात आली आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. महिला आणि इतर प्रवर्गांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

हे ही वाचा : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..

विविध अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट

अर्जात काही त्रुटी राहिल्यास त्या सुधारण्यासाठी आयोगाकडून 'ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन विंडो' खुली केली जाईल. उमेदवार 29 जून ते 1 जुलै दरम्यान आपल्या अर्जात आवश्यक ते बदल करू शकतील. अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावेत, तसेच परिक्षेसंदर्भातील अपडेट्ससाठी SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
 

हे वाचलं का?