Electoral Bond Data : निवडणूक रोख्यांची माहिती देताना SBIने युनिक कोड का लपवले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 supreme court issue notice to state bank of india electoral bond data election commission
निवडणूक आयोगाला ही माहिती जारी करताना एसबीआयने एक गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणजे‘युनिक अल्फान्युमरिक कोड'.
social share
google news

Election Commission On Electoral Bonds Data : अभिजीत करंडे, मुंबई :  गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने वेबसाईटवर जाहीर केला आहे. यामध्ये कुणी किती रूपयांचे रोखे खरेदी केले? आणि कोणत्या पक्षाला किती रूपयांचे निवडणूक रोखे मिळाले? याची माहिती जाहीर करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला ही माहिती जारी करताना एसबीआयने एक गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणजे‘युनिक अल्फान्युमरिक कोड'. आता हा ‘युनिक अल्फान्युमरिक कोड' नेमका का महत्वाचा आहे. या कोडद्वारे नेमके कोणते आणखीण तपशील समोर येणार आहेत. हे जाणून घेऊयात.  (supreme court issue notice to state bank of india electoral bond data election commission) 

खरं तर एसबीआयने दिलेल्या निवडणूक रोख्याची माहिती निवडणूक आयोगाने वेबसाईटवर जारी केली होती. मात्र ही माहिती जारी करताना एसबीआयने निवडणूक रोख्यांचा युनिक कोडच जाहीर केला नव्हता. त्यामुळे आता हा युनिक कोड जारी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एसबीआयला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता निवडणूक रोख्यासंबंधित इतर तपशील देखील उघड होणार आहे.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : ''जयंत पाटील फडणवीसांच्या संपर्कात''

सुप्रीम कोर्टाने एसबीआयला निवडणूक रोख्यांविषयी सर्व माहिती उघड करण्यास सांगितली होती. पण एसबीआयने यात दोनच याद्या जाहीर केल्या होत्या. ज्यामध्ये निवडणूक रोख्यात दान केलेल्या 763 डोनेशन देणाऱ्यांची यादी होती. तर दुसरी यादी ही राजकीय पक्षांना किती डोनेशन करण्यात आले आहे याबाबतची होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 पण एसबीआयने ही माहिती जाहीर करताना एक गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणजे एसबीआयनं निवडणूक रोख्यांची यादी जाहीर करताना‘युनिक अल्फान्युमरिक कोड’जाहीर केला नव्हता. या ‘युनिक अल्फान्युमरिक कोड’च्या माध्यमातून कोणत्या कंपनीनं किंवा व्यक्तीनं कुठल्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलं आहे? याची माहितीच उघड केली नव्हती. ही माहिती लपवण्याचा मागचं कारण काय होतं? हे आता एसबीआयच सांगू शकते? 

हे ही वाचा : Ajit Pawar : 'मोक्काच्या कारवाईतून आरोपीला वाचवलं',

'युनिक अल्फान्युमरिक कोड' महत्वाचा का आहे? 

खरं तर युनिक अल्फान्युमरिक कोड प्रत्येक इलेक्टोरल बॉन्डवर छापलेला असतो. या कोडच्या माध्यामातून 
इलेक्टोरल बॉन्डमध्ये कुणी दान केले आहे? कुठल्या राजकीय पक्षाला केलं आहे? एकूण किती रक्कम दान केली? आणि कोणत्या तारखेला रक्कम दान केली? हा सगळा तपशील उघड होतं असतो. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या नोटीशीनंतर आता एसबीआयला ‘युनिक अल्फान्युमरिक कोड’ची माहिती जारी करावा लागणार आहे. त्यामुळे आता यामधून काय तपशील समोर येतो? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT