Chhagan Bhujbal : ''जयंत पाटील फडणवीसांच्या संपर्कात'', भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal Big statement on Jayant Patil : 'शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, हीच काय मोदींची गँरंटी'' अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली होती. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, शरद पवार कृषिमंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते, त्यामुळे शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याला हमीभाव का दिला नाही.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal Big statement on Jayant Patil : प्रवीण ठाकरे, नाशिक : ''जयंत पाटील देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या संपर्कात असल्याचा'' दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा नेहमीच होत असतात. यावर जयंत पाटलांनी (jayant patil) अनेकदा हे दावे फेटाळूनही लावले आहे. मात्र तरी देखील जयंत पाटलांच्या बाबतीत अशा चर्चा होतच असतात. आता भुजबळांच्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे आगामी काळात कळणार आहे. (chhgan bhujbal big statement on jayant patil contact with devendra fadnavis and other leader ncp political crisis maharashtra politics)
छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टात युक्तीवाद करताना, छगन भुजबळांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ वापरण्यासंदर्भात मत व्यक्त केल्याचे सिंघवी यांनी दावा केला होता.''मी आयुष्यात असे कधीही म्हणालो नाही, कुणाचा फोटो दाखवून मत घ्या. आम्ही शरद पवार यांचे फोटो देखील कुठेही वापरले नाही, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले आहे. प्रचार करण्याची अजून वेळंच आली नाही, निवडणुकाही अजून लागल्या नाही. त्यात चिन्ह सध्या आमच्याकडे त्यामुळे आम्ही ते वापरणारच, असे भुजबळ यांनी सांगितले.
हे ही वाचा : BJP ने नुकतंच तिकीट दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात पॉक्सो अंतर्गत FIR दाखल!
'शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, हीच काय मोदींची गँरंटी'' अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली होती. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, शरद पवार कृषिमंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते, त्यामुळे शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याला हमीभाव का दिला नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
छगन भुजबळांनी यावेळी जयंत पाटलांबाबत खळबळजनक दावा केला. जयंत पाटील फडणवीसांसह इतर नेत्यांच्या संपर्कात आहेत. कित्येक महिने मी ऐकतोय, आज, उद्या,आज, उद्या.. त्यांचे अगोदर फायनल होऊ द्या, मग बघू काय करायचे आहे ते...,असे भुजबळ यांनी सांगितले आहे. आता छगन भुजबळांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar: 'उतारवयातील लोकांनी भजन करायचं', अजितदादांचा पुन्हा काकांना टोमणा!
ADVERTISEMENT