BJP ने नुकतंच तिकीट दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात पॉक्सो अंतर्गत FIR दाखल!
Karnatak BJP Leader BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्यावर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (sexual harassment) केल्याच्या आरोपात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Karnatak BJP Leader BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्यावर अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (sexual harassment) केल्याच्या आरोपात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात भाजपला हा एक मोठा धक्का आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत त्यांचंही नाव आहे. त्यांनाही भाजपने तिकीट दिलं आहे. (FIR filed under POCSO against former Chief Minister BS Yeddyurappa who was recently given ticket by BJP for election)
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक छळाचा आरोप!
एफआयआरनुसार, पीडित मुलगी 2 फेब्रुवारी रोजी आईसोबत फसवणुकीच्या एका प्रकरणात मदत मागण्यासाठी बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील येडियुरप्पा यांच्या घरी गेली होती. यादरम्यानच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण झाले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने काही कागदपत्रे जाहीर केली आहेत. एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेने आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांविरुद्ध 53 गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तपास सुरू आहे.
हे वाचलं का?
खोलीत ओढून नेले अन्...
एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की, भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पीडितेला खोलीत ओढून लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी खोलीतून पळून गेल्यावर तिने तिच्या आईला ही संपूर्ण घटना सांगितली.
गंभीर आरोपानंतर येडियुरप्पा काय म्हणाले?
या आरोपावर येडियुरप्पा म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्या घरी आली होती. ती रडत होती आणि काहीतरी अडचण असल्याचं सांगत होती. मी तिला विचारले काय प्रकरण आहे आणि मी स्वतः पोलिसांना फोन केला. याबाबत आयुक्तांना माहिती देऊन मदत करण्यास सांगितले. नंतर ती महिला माझ्याविरुद्ध बोलू लागली. ही बाब मी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पण पोलिसांनी माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. बघू पुढे काय होतंय, मी काय करू शकतो? यामागे कोणताही राजकीय हेतू आहे असे मी म्हणणार नाही.'
ADVERTISEMENT
याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, 'काल रात्री 10 वाजता एका महिलेने बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्य माहीत असल्याशिवाय आपण काहीही उघड करू शकत नाही. ही संवेदनशील बाब आहे कारण त्यात माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात कोणता राजकीय हेतू असेल असं मला वाटत नाही. पीडित महिलेला संरक्षण हवं असल्यास ते दिले जाईल.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT