टीना दाबीची बहीण IAS Riya Dabi ने गुपचूप केलं लग्न, नवरदेव कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Tina Dabi's sister IAS Riya Dabi married, made this IPS officer Manish Kumar her life partner
Tina Dabi's sister IAS Riya Dabi married, made this IPS officer Manish Kumar her life partner
social share
google news

Tina Dabi and Riya Dabi: नवी दिल्ली: राजस्थानच्या जैसलमेरच्या कलेक्टर आणि सुप्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी (Tina Dabi) यांची धाकटी बहीण IAS रिया दाबी (Riya Tabi) ही देखील आता विवाह (Wedding) बंधनात अडकली आहे. राजस्थान केडरच्या IAS रियाने IPS अधिकारी मनीष कुमारशी (IPS Manish Kumar) लग्न केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जोडप्याने एप्रिल महिन्यातच गुपचूप कोर्टात लग्न केले होते. (tina dabi sister ias riya dabi wedding court marraige ips officer manish kumar life partner)

ADVERTISEMENT

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेने IAS रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांच्या लग्नाची पुष्टी केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमार यांना आता राजस्थान केडरमध्ये पाठवण्यात आले आहे. याचे कारण राजस्थानमध्ये तैनात असलेल्या रिया दाबी या आयएएस अधिकारीसोबतचं लग्न कारणीभूत ठरले आहे.

रिया आणि मनीष 2021 मधील UPSC बॅचचे अधिकारी आहेत

 

हे वाचलं का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया आणि मनीषने त्यांच्या व्यस्ततेमुळे आणि वेळेच्या कमतरतेमुळे कोर्टात लग्न केले होते. आता येत्या काही दिवसांत दोघांचे कुटुंबीय लग्नाचे मोठे रिसेप्शन देऊ शकतात. या सोहळ्यात विवाहित जोडप्याचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्यासह बडे शासकीय अधिकारी सहभागी होऊ शकतात. हा कार्यक्रम दिल्ली किंवा राजस्थानमधील कोणत्याही ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो.

हे ही वाचा >> Nagpur हादरलं, बेपत्ता 3 चिमुकल्यांचे कारमध्येच सापडले मृतदेह; नेमकं काय घडलं?

रियाने 2021 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या निकालात संपूर्ण देशातून 15 वा क्रमांक मिळवला होता. तर मोठी बहीण टीना दाबी हिने UPSC परीक्षेत 2016 साली देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. दोन्ही आयएएस बहिणींना राजस्थान केडर मिळाले आहे. सध्या टीना दाबी ही जैसलमेर जिल्ह्याची जिल्हा दंडाधिकारी आहे. तर रिया अलवरमध्ये एसीएम म्हणून तैनात आहेत.

ADVERTISEMENT

टीनाचेही गेल्या वर्षी झाले लग्न

गेल्या वर्षी आयएएस टीना दाबी देखील आयएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांची जोडीदार म्हणून निवड करून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. टीना दाबी आणि प्रदीप गावंडे हे दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. आयएएस टीनाने पहिला पती अतहर आमिर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर हे दुसरं लग्न केलं आहे.

ADVERTISEMENT

 

IAS प्रदीप गवांडे आणि टीना दाबीसोबत तिची बहीण रिया दाबी.

हे ही वाचा >> मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video

2016 च्या UPSC परीक्षेत अतहर अमीरने दुसरा क्रमांक मिळवला होता. तर टीना दाबी हिला प्रथम क्रमांक मिळाला होता. प्रशिक्षणादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि 2018 साली दोघांनी लग्न केले. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2020 मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ज्याला ऑगस्ट 2021 मध्ये मान्यता देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT