कामाची बातमी: ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही मिनिटांतच अपडेट करा फोन नंबर; 'या' स्टेप्स करा फॉलो

मुंबई तक

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक असतं. वेळीच मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. 'या' टिप्सचा वापर करुन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर काही मिनिटांतच अपडेट करु शकता.

ADVERTISEMENT

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत महत्त्वाची गोष्ट
ड्रायव्हिंग लायसन्सबाबत महत्त्वाची गोष्ट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट कसा करावा?

point

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी टिप्स

point

ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबर अपडेट न केल्यास काय होतं?

मुंबई: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोहन आणि मोहित (काल्पनिक नाव) नावाचे दोन मित्र राहत होते. दोघांची मैत्री खुपच घट्ट होती. रोहनने कधी रेड लाइट क्रॉस केली तर कधी ओव्हर स्पीडिंग केला. मात्र, तरीसुद्धा त्याला चलान कापल्याचा मेसेज येत नव्हता. तसेच, मोहितने असं काही गैर केलं तर त्याबाबतीत त्याच्या मोबाइलवर लगेच चलान कापल्याचा मेसेज येत होता. रोहनला कोणतंही चलान भरावं लागत नसल्याने तो खुपच खुश होता. 

एके दिवशी रोहनने त्याची जुनी गाडी विकून नवीन गाडी घेण्याचा विचार केला, तेव्हा कार विकत घेणाऱ्याने कारची माहिती तपासली. डिटेल्स तपासल्यानंतर त्याने रोहनला सांगितले की तुमच्या गाडीवर हजारो रुपयांचे चलन आहे. हे ऐकून रोहन चकित झाला. हे कसं झालं? खरंतर, हे सगळं रोहनच्या चुकीमुळे घडलं. कारण, रोहनने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये जुनाच फोन नंबर ठेवला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी रोहनने हा नंबर वापरणं बंद केलं होतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा याबाबतीत सावधगिरी बाळगा आणि आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सववरील फोन नंबर नेहमी अपडेटेड ठेवा.

ड्रायव्हिंग लायसन्सवरील फोन नंबर कसा बदलावा?

Step 1: वेबसाईटवर जा
https://parivahan.gov.in/parivahan/ ही वेबसाईट उघडा.

Step 2: Online Services मध्ये जाऊन 'Driving License Related Services' निवडा. 
Menu वर जाऊन 'Online Services' वर क्लिक करा. त्यानंतर 'Driving License Related Services' वर क्लिक करा.

हे वाचलं का?

    follow whatsapp