Gold Rate Today : आजच खरेदी करा सोनं! नवरात्रीत किमती घसरल्या, मुंबईसह 'या' प्रमुख शहरांमध्ये भाव काय?
Gold Rate Today 11 Oct 2024 : देशभरात नवरात्री उत्सवाचा जल्लोष सुरु आहे. नवरात्रीच्या खास मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण नवरात्रीत सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवरात्रीचत ग्राहकांसाठी 'सुवर्ण' संधी

सोनं-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?

आजचे सोन्याचे भाव वाचून थक्कच व्हाल
Gold Rate Today 11 Oct 2024 : देशभरात नवरात्री उत्सवाचा जल्लोष सुरु आहे. नवरात्रीच्या खास मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण नवरात्रीत सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. भारतात सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. धनतेरसच्याआधी सोन्याच्या किंमतीत घट होणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76 हजारांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70000 रुपयांवर पोहोचली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 57500 रुपये आहे. मागील काही दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु, आजच्या भावात काहीसी घसरण झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी प्रति किलोग्रॅम 93900 रुपये आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहे? वाचा सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 76780 रुपये आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 70390 रुपये आहे.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76630 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70240 रुपये आहे.