सरकारचा घोषणांचा पाऊस, शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही? टोमॅटो शेतीवर नांगर फिरवला
Tomato Price Crisis : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील हणमंतवाडी येथील शेतकरी महादेव कराड यांनी भाव मिळत नसल्याने चार एकरांतील उभे टोमॅटोचे पीक उपटून टाकण्यास सुरुवात केली. दोन लाखांचा खर्च करून केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने त्यांच्यावर ही वेळ आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Beed News | सरकारचा घोषणांचा पाऊस
शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही? टोमॅटो शेतीवर नांगर फिरवला
Tomato Price Crisis : एकीकडे पावसाने दिलेली दडी आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव, या दुहेरी संकटामुळे बीड जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील हणमंतवाडी येथील शेतकरी महादेव कराड यांच्यावर टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने तब्बल चार एकरांतील उभे टोमॅटोचे पीक नष्ट करण्याची वेळ आली आहे. टोमॅटोच्या लागवडीपासून फवारणीपर्यंत तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र, या पिकातून त्यांच्या हातात केवळ 40 हजार रुपये उत्पन्न आले.
हेही वाचा : Personal Finance: Financial Freedom साठी नेमके किती पैसे लागतात?
तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती
महादेव कराड यांनी मे महिन्यात चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. सुरुवातीला नांगरणी, काठी करणे आणि रोपांची लागवड करून पाण्याचीही कसातरी व्यवस्था करण्यात आली. चार एकरांतून जवळपास 400 कॅरेट टोमॅटो निघाले. मात्र, बाजारात टोमॅटोला अपेक्षित भाव मिळाला नाही. निजामाबाद, तेलंगणा आणि कर्नाटक या बाजारपेठांमध्ये टोमॅटो पाठवताना एका कॅरेटमागे 50 ते 60 रुपये वाहतूक खर्च येत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यात टोमॅटोला 80, 100 किंवा 120 रुपये कॅरेट असा भाव मिळत असल्याने तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.
हेही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप
