Ulhasnagar: भयंकर.. ‘ज्या बोटाने भाजपला मतदान केलं तेच बोट मी तोडलं, फडणवीसांना…’

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger after not arresting people responsible for suicide of his brother and sister in law
ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger after not arresting people responsible for suicide of his brother and sister in law
social share
google news

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये 20 दिवसांपूर्वी ननावरे दाम्पत्याने काही गुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने एक व्हिडीओ शूट केला होता. जो आता व्हायरल झाला आहे. त्यात त्याने साताऱ्यातील काही लोकांची आणि वकिलांची नावे घेऊन हे सर्व लोक त्याचा मानसिक छळ करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ननावरे दाम्पत्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. या घटनेला आज वीस दिवसांहून अधिक दिवस झाले तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ ननावरे यांच्या भावाने चक्क स्वत:च्या डाव्या हाताचं एक बोटच थेट मुळापासून कापून टाकलं. (ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger after not arresting people responsible for suicide of his brother and sister in law)

ADVERTISEMENT

ननावरे यांच्या भावाने एक व्हिडीओ शूट केला असून त्यात त्यांनी तोडलेलं बोट दाखवलं आहे. स्वत:चं तोडलेले बोट घेऊन ते थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. जिथे त्यांनी टेबलावरच आपलं बोट फेकलं. ज्यामुळे एकच खळबळ माजली.

आपलं हे बोट आपण राज्य सरकारला पाठवत आहोत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शरीराचा एक-एक भाग कापून घेणार असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण ?

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील अशेलेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे हे कुटुंबासह राहत होते. सुमारे 20 दिवसांपूर्वी ननावरे यांनी पत्नीसह बंगल्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ननावरे यांच्या पत्नीचे नाव उर्मिला आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी, एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये ननावरे यांनी सांगितले की, काही गुंड त्याला त्रास देत होते, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत.

नंदकुमार ननावरे हे यापूर्वी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर गेली काही महिने ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र या घटनेनंतर डॉ. ननावरे हे आपले स्वीय सहाय्यक नसल्याचे बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ulhasnagar crime : पती-पत्नीची आत्महत्या, आमदार किणीकरांना का करावा लागला खुलासा?

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या पँटच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. फिर्यादीत व्हिडीओ आणि चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करीत असल्याचे म्हटले असतानाही रणजितसिंह निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख यांची थेट आरोपी म्हणून नावे न टाकता त्यांना सरंक्षण दिले असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त केली होती.

सदरच्या गुन्ह्याचा तपास हा विठ्ठलवाडी पोलिसांकडून काढून घेत गुन्हे शाखेला दिला आहे. धनंजय ननावरे हे मागील आठवड्याभरापासून खंडणी विभागातील तपास अधिकाऱ्यांची भेट घेत फॉलअप घेत आहेत. मात्र त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर धनंजय ननावरे यांनी त्यांच्या हाताचे बोट कापत ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट पाठवले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारला ह्याच बोटाने मतदान केल्याचे प्रायश्चित म्हणून पहिला अवयव बोट म्हणून पाठवत असल्याचे धनंजय ननावरे याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT