मोठी बातमी! बडोद्यात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली,12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा बुडून मृत्यू
वडोदऱ्यातील हर्णी तलावात एका बोटीतून 23 विद्यार्थी आणि 4 शिक्षक प्रवास करत होते. या प्रवासा दरम्यान बोट अचानक उलटल्याची घटना घडली होती. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
Vadodara Boat Capsized : गुजरातच्या बडोद्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.बडोद्यातील हर्णी तलावात विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या घटनेने गुजरातमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (vadodara boat capsizes harni lake vadodara gujarat boat accident)
ADVERTISEMENT
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बडोद्यातील हर्णी तलावात एका बोटीतून 23 विद्यार्थी आणि 4 शिक्षक प्रवास करत होते. या प्रवासा दरम्यान बोट अचानक उलटल्याची घटना घडली होती. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बोटीवर 27 खाजगी शाळेचे विद्यार्थी होते आणि त्यांना लाईफ जॅकेट न घालता बोटीत बसण्याची सोय करण्यात आली होती.
हे ही वाचा : Shiv Sena UBT: गरीबांची खिचडी खाल्ली तरी कोणी?, सूरज चव्हाणला कोर्टात हजर केलं पण…
दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि बचाव पथकाला देण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या शोध सुरु केला आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकानं पाच मुलांना वाचवलं असल्याची माहिती मिळाली आहे.गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. हर्णी तलावात बुडून 12 मुलांचा आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
बोट उलटल्याच्या घटनेवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो.या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. दयाळू देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
हे ही वाचा : ‘धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मारहाण’, गैरवर्तन…, करूणा शर्माचे खळबळजनक आरोप
दरम्यान बोटीतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे बचावकार्य सध्या सुरू आहे. अपघातातील जखमींना तातडीने मदत आणि उपचार देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच तलावात बुडालेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT