Valentine Day : एक गाव असंही... जिथे खुलतात प्रेमाचे गुलाब, होतात फक्त प्रेमविवाह!
Chandrapur Village of Love Marriage : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक असं गाव आहे, जे प्रेमविवाहासाठी ओळखले जाते. येथील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील करंजी गावात गेल्या 40 वर्षांपासून 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील याच गावचे रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेमविवाहाच्या परंपरेवर गावकरी काय म्हणाले?

प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांचीही काढतात समजूत

व्हॅलेंटाईन डेला हे गाव देतंय प्रेमाचा संदेश
विकास राजुरकर
Chandrapur Village of Love Marriage : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक असं गाव आहे, जे प्रेमविवाहासाठी ओळखले जाते. येथील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील करंजी गावात गेल्या 40 वर्षांपासून 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील याच गावचे रहिवासी आहेत. त्यांनीही प्रेमविवाह (Love Marriage) केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एवढंच नाही तर 11 सदस्यीय ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच अशा सहा सदस्यांनीही प्रेमविवाह केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 40 वर्षांपासून या गावात प्रेमविवाहाची परंपरा सुरू आहे, जी आजतागायत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या गावात तंटामुक्त समिती सक्रिय आहे जी गावात निर्माण होणारे वाद मिटवण्याचे काम करते.
या समितीच्या माध्यमातून प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्याला मार्गदर्शन केले जाते. कुटुंबीयांना समजावून सांगितले जाते आणि मुला-मुलीच्या संमतीनंतर गावातील मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत लग्न लावून दिले जाते.