पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; मालगाडीच्या धडकेत एक्सप्रेसमधील अनेकांचा जागीच मृत्यू!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भीषण रेल्वे अपघातामागील नेमकं कारण काय? 

point

लोकोपायलटची ती एक चूक अनेकांच्या जीवावर बेतली

Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमधील (West Bengal) सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला (Kanchanjunga Express) सोमवारी (17 जून) सकाळी न्यू जलपाईगुडीजवळ अपघात झाला. या एक्सप्रेसला मालगाडीने मागून जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मालगाडीची धडक बसल्यानंतर एक्सप्रेसच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. तर अनेक बोगी हवेत उचलल्या गेल्या. 15 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे, हा आकडा वाढूही शकतो. तर, मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. (west bengal accident many people in the kanchanjunga express died on the spot in the collision of the freight train

ADVERTISEMENT

भीषण रेल्वे अपघातामागील नेमकं कारण काय? 

रेल्वे सूत्रांनी या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. माहितीनुसार, सकाळी 5.30 वाजल्यापासून रानीपात्रा रेल्वे स्टेशन आणि छत्तर हाट जंक्शन दरम्यान ऑटोमेटिक सिग्नलिंग सिस्टम खराब झाले होते. यावेळी रेल्वे क्रमांक 13174 (सियालदह कांचनजंगा एक्स्प्रेस) सकाळी 5.50 वाजता रानीपात्रा रेल्वे स्टेशन आणि छतर हाट दरम्यान ऑटोमेटिक सिग्नलिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे थांबली होती.

हेही वाचा : कीर्तिकरांनी 'ती' 2 मिनिटे घालवली अन् मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल बदलला?

तसंच, एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, 'जेव्हा ऑटोमेटिक सिग्नलिंग सिस्टम बिघडते, तेव्हा स्टेशन मास्टर TA 912 नावाचे लिखित प्राधिकरण जारी करतात. हे चालकाला बिघाडामुळे सेक्शनमधील सर्व लाल सिग्नल ओलांडण्याचा अधिकार देते.'

हे वाचलं का?

त्यांनी सांगितले की, रानीपात्राच्या स्टेशन मास्टरने ट्रेन क्रमांक 13174 (सियालदह कांचनजंगा एक्सप्रेस) साठी टीए 912 जारी केले होते. पण त्याचवेळी एक मालगाडी येऊन 13174 या एक्सप्रेसला धडकली. त्यामुळे गार्डचा डबा, दोन पार्सल डबे आणि एक जनरल सीटिंग डबा रुळावरून घसरला.

हेही वाचा : वायकरांच्या निकालाविरोधात ठाकरेंनी थोपटले दंड, सगळा प्लॅन आला समोर

 

लोकोपायलटची ती एक चूक अनेकांच्या जीवावर बेतली

मालगाडीच्या लोकोपायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे रेल्वे बोर्डाने आपल्या प्राथमिक निवेदनात म्हटले होते. या अपघातात एकूण मृतांची संख्या आठ असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संख्या 15 पर्यंतही असू शकते असे काही स्थानिक अधिकारी सांगतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 105 जागा, तर...

 

त्याचबरोबर इंडियन रेल्वे लोको रनिंगमेन्स ऑर्गनायझेशन (IRLRO) चे कार्यकारी अध्यक्ष संजय पांधी म्हणाले, 'अपघातासाठी लोको पायलटला जबाबदार धरणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या अपघातात त्यांना जीवही गमवावा लागला. सीआरएस तपास अजून बाकी आहे.'

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT