बारामतीत चाललंय तरी काय?, 12 लॉजमध्ये सापडले शाळा-कॉलेजातील मुलं-मुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

what is going on in baramati school college boys and girls found in 12 lodges police raids
what is going on in baramati school college boys and girls found in 12 lodges police raids
social share
google news

बारामती: बारामती (Baramati) शहर आणि एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या लॉजवर (Lodge) पोलिसांनी केलेल्या छापेमारीत शाळकरी मुलं-मुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंधरा ठिकाणी छापेमारी केली त्यात अनेक लॉजवर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे. तसेच यामुळे पालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. (what is going on in baramati school college boys and girls found in 12 lodges police raids)

बारामतीत 12 लॉजवर सापडले अल्पवयीन मुलं-मुली

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांना यापूर्वी सूचना दिल्या होत्या. याशिवाय लॉजवर काही तासांसाठी शाळकरी मुलांना रुम उपलब्ध करुन दिल्या जात असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. त्यावरुन अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे, सुनील महाडिक यांनी अचानक धाडसत्र सुरू केले. त्यात 15 लॉजवर केलेल्या छापेमारीत 12 ठिकाणी शाळकरी मुले आणि मुली आढळून आले आहेत.

हे ही वाचा>> मुलगी 5 वर्षाची झाली तरी संशय, दोघांनी टेस्ट करताच धक्काच बसला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुले आणि मुली कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडतात आणि मौजमजेसाठी लॉजवर जातात. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, बारामती परिसरातील जवळपास सर्व लॉज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत. याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील तक्रारी आल्यावर कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. पण शाळकरी मुलांना तासाभरासाठी लॉजमध्ये रुम उपलब्ध करुन देण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापेमारी केली. त्यामुळे आता यापुढे लॉजवर शाळकरी मुले आढळल्यास लॉज मालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.

पिंपरीत लॉजवर सुरु होता वेश्या व्यवसाय

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील पिंपरीत लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्या व्यवसाय बंद पाडला होता. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीसह तीन महिलांची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका केली होती. छत्तीसगड येथील अभिनेत्रीकडून पिंपरीत वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> वहिनीने दिराकडे केलं दुर्लक्ष…रागाच्या भरात भावाच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार

छत्तीसगड येथील एका अभिनेत्रीद्वारे पिंपरी-चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या ताथवडे येथील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला होता. या सापळ्यात आरोपी अडकल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT