Manoj Jarange : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू असताना जरांगे पाटील काय करत होते?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Manoj jarange reaction on ram mandir pran pratishtha at ayodhya.
Manoj jarange reaction on ram mandir pran pratishtha at ayodhya.
social share
google news

Manoj Jarange on Ram Lalla Pran Pratishtha : अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडला. अयोध्येत हा सोहळा सुरू असताना देशातील वातावरण भारावून टाकणारं होतं. पण, मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे येत असलेले मनोज जरांगे पाटील हा कार्यक्रम सुरू असताना कुठे होते आणि ते काय करत होते? जाणून घ्या… (what did said manoj jarange patil on ram mandir pran pratishtha)

ADVERTISEMENT

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीहून पदयात्रा काढली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला येत असून, ते मुंबईत उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेचा २२ जानेवारी तिसरा दिवस असून, ते अहमदनगर जिल्ह्यात होते.

हेही वाचा >> “काही लोकं म्हणत होते, राम मंदिर बनलं तर आग लागेल”

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू असताना जरांगे कुठे होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारे गावात पोहोचले होते. या गावातील राम मंदिरात जाऊन जरांगे पाटलांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. मनोज जरांगे पाटील यांनी प्रभू रामांची आरती केली. मनोज जरांगे हे मंदिरात येणार म्हणून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

हे वाचलं का?

हेही वाचा >> सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरेंच्या याचिकेवर कोर्टात काय झालं?

मनोज जरांगे पाटील राम मंदिराबद्दल काय बोलले?

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे. तो दिवस आम्ही साजरा करतोय. भाजप असो की काँग्रेस असो… मी काही बघणार. राम भारतवासी आहे सगळ्या जनतेचा. भारतवासीयांचा आनंदाचा क्षण आहे. खूप दशकांनंतर ही प्रतिक्षा आता संपली. जो आनंदाचा दिवस उगवायचा होता, तो आज उगवला. पूर्ण भारतवासी आनंद मोठ्या उत्साहात साजरा करताहेत, कारण राम हे हिंदू धर्माचा गर्व आहेत, स्वाभिमान आहेत. भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहेत”, असा आनंद जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT