Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?
भारताची चांद्रयान-3 मोहीम आज (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनेल. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर फक्त विक्रम लँडर उतरेल. ज्याच्या आत प्रज्ञान रोव्हर आहे.
ADVERTISEMENT

Chandrayaan-3 Soft Landing : भारताची चांद्रयान-3 मोहीम आज (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनेल. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर फक्त विक्रम लँडर उतरेल. ज्याच्या आत प्रज्ञान रोव्हर आहे. (what work will Vikram lander and Pragyan rover do after Chandrayaan-3 Landing)
प्रज्ञान रोव्हरचे दोन पेलोड कोणते? कसं काम करणार?
सर्वातआधी प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार आहे याविषयी आपण जाणून घेऊयात. प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत. पहिले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. खनिजांचाही शोध घेईल.
Supriya Sule : अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल, सुप्रिया म्हणाल्या, ‘चुकीचं…’
याशिवाय, प्रज्ञानावरील दुसरा पेलोड अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आहे. ते घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह. हे सर्व घटक लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जातील.
विक्रम लँडरबद्दल सर्वकाही जाणून घ्या…
विक्रम लँडरमध्ये चार पेलोड आहेत. पहिली रंभा (RAMBHA). ते चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि भिन्नता तपासेल. दुसरा चास्टे (ChaSTE) पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाच्या उष्णतेची चाचणी करेल. तिसरा ILSA पेलोड लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपाच्या गतीविधींची तपासणी करेल. चौथा लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे (LRA) पेलोड चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.










