…म्हणून मी मित्रांना घरी बोलावत नाही! माझी बायको त्यांच्यासोबत…, मी काय करू?

मुंबई तक

जोडप्यात अशा अनेक गोष्टी देखील होतात, ज्यामुळे नात्यात अडचण येते. यातीलच एक कारण म्हणजे, नवरा-बायकोतल्या खाजगी गोष्टी मित्र-मैत्रिणींना शेअर करणे. बायकोच्या या सवयीमुळे देखील नात्यात समस्या निर्माण होतात.

ADVERTISEMENT

wife sharing internal drama husband wife stop inviting friend on home my story relationship
wife sharing internal drama husband wife stop inviting friend on home my story relationship
social share
google news

Husband-Wife relationship : नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. जर नात्यात विश्वास नसेल तर ते नाते लगेच कमकुवत होते. या कमकुवत नात्यामुळे पुढे अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तसेच जोडप्यात अशा अनेक गोष्टी देखील होतात, ज्यामुळे नात्यात अडचण येते. यातीलच एक कारण म्हणजे, नवरा-बायकोतल्या खाजगी गोष्टी मित्र-मैत्रिणींना शेअर करणे. बायकोच्या या सवयीमुळे देखील नात्यात समस्या निर्माण होतात. (wife sharing internal drama husband wife stop inviting friend on home my story relationship)

खरं तर माझ्या बायकोला एक खुप वाईट सवय आहे. ती माझ्या मित्र-मैत्रिणींना आमच्या नवरा-बायकोच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत असते. तिच्या या सवयीमुळे मला माझ्याच मित्रांसमोर लाज गेल्यासारखे वाटते. याच सवयीमुळे आमच्यामध्ये अनेकदा वाद देखील झाले होते. मात्र वादानंतर देखील तिच्यात काहीच सुधारणा झाली नाही आहे. याच कारणामुळे आता मी माझ्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावण्यास टाळायला सूरूवात केली आहे. कारण मला भीती वाटते की माझी बायको आमच्यातल्या काही खाजगी गोष्टी त्यांना बोलून मोकळी होईल.

हे ही वाचा : Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

आता सध्या अशी परिस्थिती आहे की, ना तिच्या सवयीत बदल होत आहे, ना ती मला एकट्यात बाहेर जाऊ देत नाही. जरी मी एकटा गेलोच तरी माझ्यावर संशय व्यक्त करते. अशा परिस्थितीत आता मला काय केले पाहिजे.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

नवरा-बायको जर अशा समस्यांना सामोरे जात असतील तर सायकोलॉजिस्ट आणि एनदर लाईट काऊसलिंगची संस्थापिका आंचल नारंग यावर सल्ला देतात की, ही खूप सामान्य गोष्ट आहे. कारण अनेकांना असे वाटते की त्यांचा पार्टनर त्यांच्या पाठीमागे अनेक खाजगी गोष्टी शेअर करत असतो. अशा परीस्थितीत दोघांनीही एकत्र बसून शांततेत यावर चर्चा केली पाहिजे.

हे वाचलं का?

    follow whatsapp