अंतराळातून परतलेल्या सुनिता विल्यम्स चालणं विसरतील का?
Sunita Williams: अंतराळातून 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतलेल्या सुनिता विल्यम्स या चालणं विसरतील असं सातत्याने बोललं जात आहे. पण तसं खरंच आहे का? याबाबत आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

वॉश्गिंटन: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी तब्बल 9 महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप पुनरागमन केलं आहे. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे त्यांचं यशस्वी लँडिंग झालं. मात्र, इतका दीर्घ काळ गुरुत्वाकर्षणरहित अवकाशात (Zero Gravity) घालवल्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम झाले असतील आणि ते चालणं विसरतील का? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया.
अंतराळात 9 महिन्यांचा प्रवास
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेले होते. ही मोहीम सुरुवातीला फक्त 8 दिवसांची होती. परंतु, स्टारलाइनर यानात हेलियम गळती आणि थ्रस्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळातच अडकून राहावं लागलं. अखेरीस, नासा आणि स्पेसएक्सने संयुक्तपणे क्रू-9 मोहिमेअंतर्गत त्यांना पृथ्वीवर परत आणलं. या 286 दिवसांच्या कालावधीत त्यांनी अंतराळात संशोधन करताना अनेक आव्हानांचा सामना केला.
हे ही वाचा>> Sunita Williams : 8 दिवसांची मोहीम तब्बल 9 महिने कशी लांबली, कुठे आणि कश्या आल्या होत्या अडचणी?
गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेचा शरीरावर परिणाम
अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर अनेक परिणाम होतात. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे स्नायू आणि हाडांवर ताण पडत नाही, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि हाडांची घनता कमी होते. तज्ज्ञांच्या मते, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थानकावर नियमित व्यायाम केला असला तरी पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना पुन्हा गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घ्यावं लागेल. यासाठी काही काळ त्यांना चालण्यात अडचण येऊ शकते.
नासाच्या माजी वैद्यकीय संशोधक डॉ. जेम्स पावेल यांनी सांगितलं, "अंतराळातून परतणाऱ्या अंतराळवीरांना सुरुवातीला चालताना असंतुलन जाणवतं. स्नायूंना पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची सवय होण्यासाठी किमान काही दिवस ते दोन-तीन आठवडे लागू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की ते चालणं पूर्णपणे विसरतील."










