Sunita Williams : 8 दिवसांची मोहीम तब्बल 9 महिने कशी लांबली, कुठे आणि कश्या आल्या होत्या अडचणी?
Sunita Williams Return on Earth : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासमोर अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानं असणार आहेत. 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर, त्यांची हाडे आणि स्नायू चांगलीच कमकुवत झाली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नासाचं मिशन तब्बल 9 महिने कसं लांबलं?
ट्रम्प आणि एलन मस्क यांनी नेमके काय दावे केले?
Sunita Williams Return on Earth : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर प्रक्षेपण केलं होतं. या अंतराळयानातून पहिल्या क्रू फ्लाइटसाठी प्रक्षेपण केलं आणि 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. SpaceX च्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे ते परत पृथ्वीवर आले. या यानातून 17 तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलने ते 19 मार्च रोजी IST पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात उतरले.
आठ दिवसांची मोहीम 9 महिने कशी लांबली?
नासाचं हे मिशन सुरूवातीला फक्त आठ दिवसांचं होतं. मात्र नंतर काही अडचणींमुळे मोहीम तब्बल नऊ महिने लांबली. त्यानंतर अंतराळ स्थानकातील तांत्रिक गुंतागुंतीमुळे नासाने स्टारलाइनर यान रिकामेच परत आणले आणि दोघांनाही स्पेसएक्समध्ये हलवलं. स्पेसएक्स कॅप्सूलमधील पुढील तांत्रिक समस्यांमुळे अतिरिक्त महिनाभर विलंब झाला.
जून 2024: स्टारलाइनर 5 जून रोजी आयएसएससाठी प्रक्षेपित झाल होतं. जे 14 जूनपर्यंत परत येणार होतं. मात्र, हेलियम गळतीमुळे अडचणी आल्या. त्यामुळे सुरुवातीला ही मोहीम 18 जून आणि नंतर 26 जूनपर्यंत लांबली.
ऑगस्ट 2024: नासाने सुचवलं, की अंतराळवीरांना वेगळ्या अंतराळयानातून परतावं लागू शकतं. त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी स्टारलाइनर क्रूला सोडून अंतराळातून परत निघालं. 7 सप्टेंबर रोजी ते न्यू मेक्सिकोमध्ये उतरलं.










