चक्क एकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, ‘हे’ नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

women gives birth to twins four week conceived 3 weeks apart superfetation englans women story
women gives birth to twins four week conceived 3 weeks apart superfetation englans women story
social share
google news

एका महिलेने गर्भवती झाल्यानंतर जुळ्यांना किंवा तिळ्यांना जन्म दिल्याच्या घटना आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र या घटनेत एक महिला एकाच महिन्यात दोनदा प्रेग्नेंट राहिली होती. या प्रेग्नेंन्सीतून महिलेने दोन जु्ळ्या बाळांना जन्म दिला आहे. मात्र या जुळ्या मुलींमध्ये चार महिन्याचे अंतर आहे. दोन्ही मुले निरोगी आहेत. या प्रेग्नेंन्सीची चर्चा आता सर्वदुर पसरली आहे. (women gives birth to twins four week conceived 3 weeks apart superfetation englans women story)

ADVERTISEMENT

द सनच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या लेमिनस्टर शहरात राहणाऱ्या सोफी स्मॉलने जुडवा मुलींना जन्म दिला आहे. या दोन्ही बहिणींमध्ये चार आठवड्याचे अंतर आहे. खरं तर ही महिला गर्भवती असतानाच पुन्हा एकदा गर्भवती झाली होती. यातूनच या जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे.

इंग्लंडच्या 30 वर्षीय सोफी स्मॉलने सुपरफिटेशनची घटना सांगितली आहे. या घटनेत सोफी गर्भवती असताना एकाच महिन्यात पुन्हा एकदा गर्भवती झाली होती. मला माहितीच नव्हते मी गर्भवती आहे. मला डोकेदुखी होत होती, पण विश्वास नव्हता की मी गर्भवती आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न सुरुच ठेवल्याचे सोफीने सांगितले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Deveraj Patel : ‘दिल से बुरा लगता है भाई’ मीममधील देवराज पटेलचे निधन

सुपरफिटेशन म्हणजे काय?

सुपरफिटेशन म्हणजे गर्भावस्थे दरम्यान ज्या महिला दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होतात, या अवस्थेला सुपरफिटेशन म्हणतात. या अत्यंत दुर्मिळ घटना असतात. अशा घटना त्या महिलांसोबत जास्त घडतात, ज्या विट्रो फर्टिलायजेशन (IVF) सारख्या फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतात. महिलेची पहिली प्रेग्नेंन्सी सुरू होण्याच्या काही दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर एग्ज स्पर्म संपर्कात येतो आणि फर्टीलाईज होतो. अशा अवस्थेत मुले बहुतेकदा एकदा किंवा एकाच दिवशी जन्म घेतात. सुपरफिटेशनमध्ये गर्भवली महिलेचा एग फर्टीलाईज होऊन दुसऱ्यांदा गर्भात स्वतंत्रपणे रोपण केले जाते.

अशा अवस्थेत तीन संभाव्य घटना एकाचवेळी घडणे आवश्यक आहेत. प्रथम अंडाशयाला दुसरे अंडे किंवा ओव्हम सोडावे लागते. जे सहसा होत नाही. दुसऱ्यांदा अंड्याला फलित करते. हे देखील अशक्य आहे. कारण गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कालव्यामध्ये श्लेष्मा तयार होतो आणि एक प्लग तयार करतो, जो स्पर्मचा मार्ग रोखतो. आणि तिसरे गर्भाशयात आधीच भ्रृण असताना फलित अंड्याचे रोपण करते. जर या गोष्टी झाल्या तर एकाचवेळेस दोनदा गर्भधारणा होऊ शकते. पण या गर्भातील बाळांचे वय वेगवेगळे असते. या बाळांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यांवर होईल.तसेच ही जुळी मुले सामान्य जुळ्या बाळांप्रमाणे एकदम वेगळी असतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अरेरे… चिमुकल्याच्या जीभेऐवजी चक्क केलं प्रायव्हेट पार्टचं ऑपरेशन!

सोफीला आधीच एक मुल आहे आणि त्याचे नाव ऑक्सर आहे. जेव्हा मी डार्सीला जन्म देत होती, त्यावेळेस मला खुप त्रास झाला.सात आठवड्यात मी आठ वेळा रूग्णालयात भरती झाली होती. तसेच मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती, माझ्य़ा गर्भात दोन मुले आहेत आणि तीही वेगवेगळ्या आकारांची, असे सोफी म्हणते.

ADVERTISEMENT

मी इतकी आजारी होते की डॉक्टरांनाही समजायला अवघड जात होते. माझे सातव्या आठवड्याला स्कॅन झाले,त्यामध्ये त्यांनी जुडवा मुले होण्याची माहिती दिली होती. तर एक बाळ दुसऱ्या बाळाशी मोठे असल्याचे देखील सांगितले. दरम्यान आता सोफी ज्यावेळेस तिच्या गर्भावस्थेची माहिती सांगते, ते एकूण अनेकांना धक्काच बसतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT