धक्कादायक... वाल्मिकने खंडणी मागितलेल्या अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू, रस्त्यावरच सापडला मृतदेह

मुंबई तक

Avaada Company Worker Death: अवादा कंपनीतील एका कामगाराचा अचानक झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू
अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अवादा पवन ऊर्जा कंपनीतील कामगाराचा मृत्यू

point

पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला

point

मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही

बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता याच कंपनीतील एका कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे. 

नेमकी घटना काय?

पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा>> Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांचा खून, तिसरा भाऊ गंभीर जखमी, घडलंय तरी काय?

केज शहरातील केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या बारसमोरच  मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. आता या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.

अवादा कंपनीतील या कामगाराचा नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत मात्र गूढ कायम आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी आता पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली. त्यामुळे आता या कामगाराचा नेमका कसा आणि कशामुळे मृत्यू झाला याचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp