IMD: ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, हवामान खात्याने पावसाबाबत दिला मोठा इशारा

रोहित गोळे

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असून हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

ADVERTISEMENT

very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today
very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today
google news

Mumbai Rain: मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आता वायव्य दिशेला त्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा (Heavy Rain) जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज (26 जुलै) मुंबई (Mumbai) आणि परिसरात दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे येथील धरणं तुडुंब भरले असून त्यापैकी अनेक धरणांचे दरवाजेही उघडले आहेत. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today)

मुंबईकरांनो सावधान

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज (26 जुलै) रात्री 8 ते उद्या (27 जुलै) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हे वाचलं का?