बीड : पत्नी नांदायला येत नसल्याने पती संतापला; पोटच्या दोन लेकरांना डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

मुंबई तक

Beed Crime : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने स्वतःच्या दोन लहान मुलांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : पत्नी नांदायला येत नसल्याने पती संतापला

point

पोटच्या दोन लेकरांना डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Beed Crime : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या संसारातील कुरबुरीचा राग पोटच्या निष्पाप मुलांवर काढत एका पित्याने अमानवीयतेची सीमा ओलांडली आहे. पत्नी माहेरून नांदायला परत येत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या या पित्याने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या भयानक प्रकारामुळे लहामेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून एखादा पिता इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो, हे पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, या घटनेत मुलांचा जीव वाचला असला तरी या बापाच्या क्रूरपणामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 'मला मरायचं नाहीये, पण..' भाजप नेत्याची आत्महत्या, कोणावर केले खळबळजनक आरोप?

 पत्नीच्या विरहातून पित्याचा हैवान अवतार; डिझेल ओतून चिमुकल्यांना संपवण्याचा कट

या प्रकरणातील आरोपी पित्याचे नाव महेश सामसे असे असून, गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी कौटुंबिक वादामुळे माहेरी राहत होती. महेशने आपल्या पत्नीला वारंवार नांदायला येण्यासाठी बोलावले, मात्र ती परत येत नसल्याने तो कमालीचा मानसिक तणावात आणि रागात होता. याच रागाचा भरात त्याने गुरुवारी आपल्या दोन लहान मुलांवर आपला सर्व संताप काढण्याचे ठरवले आणि त्यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून देण्याचा क्रूर प्रयत्न केला. आपल्या पोटच्या लेकरांच्या जीवावर उठलेल्या या पित्याच्या हैवान अवतारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. स्वतःच्या पोटच्या मुलांवर असा जीवघेणा हल्ला करण्याच्या या प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

हे वाचलं का?