मोठी बातमी... ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत, आता पुढे काय?
प. बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की, त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत.
ADVERTISEMENT

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, "आम्ही निवडणूक हरलो नाही, आमचा पराभव झाला आहे. भाजपने निवडणूक आयोगाचा वापर करून विजय मिळवला." पण याचवेळी ममता बॅनर्जी यांनी एक मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या की, प. बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा त्या राजीनामा देणार नाहीत.
ममता म्हणाल्या, "आमची लढाई भाजपशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. २००४ पासून मी असे अत्याचार पाहिले नाहीत. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे."
ममता पुढे म्हणाल्या की, 'जर भाजपने निष्पक्ष निवडणूक जिंकली असती, तर त्यांना कोणतीही तक्रार नसती, पण आम्ही हरलेलो नाही. भाजपने हा विजय चोरला आहे. त्यांनी एसआयआरमधून 90 लाख नावे काढून टाकली. जेव्हा आम्ही न्यायालयात गेलो, तेव्हा 32 लाख लोकांची नावे परत समाविष्ट करण्यात आली. पण त्यानंतर, आणखी 7 लाख नावे समाविष्ट करण्यात आली. हे कसे झाले, हे कोणालाच माहीत नाही.'
"मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. 2004 पासून मी असा दडपशाहीचा प्रकार पाहिला नाही. हे भयानक आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मिळून आमचा पराभव केला आहे. भाजपने आम्हाला हरवण्यासाठी प्रत्येक डावपेच वापरला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला."









