युट्यूबर बिंदास काव्या कोण आहे?; तिचं खरं नाव काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर बिंदास काव्या अचानक चर्चेत आली. बिंदास काव्याच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर ती घरातून निघून गेली आणि तेव्हापासून बेपत्ता असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. बिंदास काव्या पोलिसांना मध्य प्रदेशातील इटारसी येथे सापडली. त्यानंतर काव्याच्या काव्याच्या आईवडिलांसह फॉलोअर्संनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बिंदास काव्याची बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर तिच्याबद्दल माहिती असणाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. तर ज्यांना माहिती नाही, ते तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करताहेत. तर समजून घेऊयात बिंदास काव्या कोण आहे आणि तिचं खरं नाव काय?

बिंदास काव्या कोण आहे?

बिंदास काव्या प्रसिद्ध युट्यूबर आहे. ती औरंगाबादमधील पडेगाव भागात राहते. बिंदास काव्याचं खरं नाव काव्या यादव आहे. तिचं पूर्ण नाव काव्या सूरज यादव असं आहे. ती वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडीओ बनवते. तिच्या युट्यूबर चॅनेलचे ४ मिलियनपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तसेच इन्स्टाग्रामवरही तिचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बेपत्ता बिंदास काव्या अखेर सापडली! कुठे होती काव्या यादव?

बिंदास काव्या सुरुवातीला टिकटॉक वर व्हिडीओ करायची. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर काव्या सोशल मीडिया आणि युट्यूबवर व्हिडीओ शेअर करू लागली. बिंदास काव्या वयाच्या १५ वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आली.

ADVERTISEMENT

बिंदास काव्याची जन्मतारीख, वय आणि ठिकाण

बिंदास काव्याचा जन्म ३० मार्च २००४ रोजी झालेला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात तिचा जन्म झाला. बिंदास काव्याचं वय जवळपास १८ वर्ष असून, तिची उंची 5.3 इंच आहे. वजन जवळपास ५० किलो आहे.

ADVERTISEMENT

बिंदास काव्याने २०१८ मध्ये युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तिने पहिला व्हिडीओ २७ ऑगस्ट २०१८ रोजी अपलोड केला होता. तिचा हा पहिला व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. बिंदास काव्याचं गेमिंग युट्यूब चॅनेलही आहे. बिंदास काव्याने गेमिंग युट्यूब चॅनेल २०१९ मध्ये सुरू केलं होतं.

बिंदास काव्या कुठे सापडली

बिंदास काव्या रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. तिच्या अभ्यास करण्यावरून तिच्यावर वडील रागावले. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर बिंदास काव्या ९ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती. औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

छावणी पोलिसांनी तपास केला. बिंदास काव्याचा शोध घेतल्यानंतर ती रेल्वेने गेल्याचं माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. ती रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये ती सापडली. त्यानंतर तिला परत आणण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT