Viral: महिलेने मुलांना सेमी न्यूड शरीरावर करायला लावलं पेंटिंग, हायकोर्ट म्हणालं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman paints semi nude body children kerala high court it is not obscene
woman paints semi nude body children kerala high court it is not obscene
social share
google news

Latest News in Marathi: तिरुअनंतपूरम: नग्नता आणि अश्लीलता यातील फरक स्पष्ट करताना केरळ उच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निकाल देताना म्हटले आहे की, महिलेच्या शरीराकडे अश्लीलतेने पाहिले जाऊ नये. अनेकदा लोकांना त्यांच्या शरीराच्या स्वायत्ततेचा अधिकार नाकारला जातो, जे योग्य नाही. असे म्हणत न्यायालयाने एका महिलेवर दाखल केलेला अश्लीलतेचा गुन्हा रद्दबातल ठरवला आहे. (woman paints semi nude body children kerala high court it is not obscene)

खरं तर, संबंधित महिलेवर तिच्या मुलांसोबत अर्धनग्न शरीर रंगवून व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. महिलेच्या शरीराविषयीच्या पितृसत्ताक कल्पनांना आव्हान देण्यासाठी आणि तिच्या मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी तिने हा व्हिडिओ बनवला असल्याचे महिलेचे म्हणणे होते. याच प्रकरणी महिलेविरोधात अश्लीलतेचा प्रसार केल्याचं म्हणत खटला दाखल करण्यात आला होता. पण या व्हिडिओला अश्लील म्हणता येणार नाही, असं म्हणत कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

हे ही वाचा >> मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…

‘महिलेचा स्वतःच्या शरीरावर हक्क’

न्यायालयाने म्हटले की, महिलांच्या शरीराच्या वरच्या भागाच्या नग्नतेला लैंगिक किंवा अश्लील म्हणता येणार नाही. स्त्रीचे नग्न शरीर हे कोणत्याही प्रकारे अश्लील नाही. न्यायालयाने सांगितले की, महिलेने मुलांना तिचे शरीर कॅनव्हासप्रमाणे रंगवण्याची परवानगी दिली. आपल्या शरीराबद्दल स्वायत्त निर्णय घेणं हा स्त्रीचा अधिकार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोर्टाने टोचले कान

न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ म्हणाले की, पुरुषांच्या नग्न शरीरावर क्वचितच प्रश्न विचारला जातो. स्त्रियांबाबत मात्र सतत विचारपूस करणे हे पुरुषसत्ताक रचनेचे लक्षण आहे. महिलांना त्यांच्या धाडसी निवडींसाठी नेहमीच त्रास दिला जातो.

हे ही वाचा >> Uttar Pradesh : हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!

समाजातील स्त्री-पुरुषांबाबत समाजाच्या दुटप्पीपणाबाबत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, जर एखाद्या आईने आपल्या मुलांना तिच्या शरीराचा वापर कॅनव्हास म्हणून रंगविण्यासाठी करण्याची परवानगी दिली तर त्यात काहीही चुकीचे नाही. महिलेने तिच्या स्वत:च्या मुलांना तिच्या शरीराचा वरचा भाग रंगवण्याची परवानगी दिली, जे कोणत्याही अर्थाने लैंगिक कृत्य नाही आणि त्याला अश्लील म्हणता येणार नाही. पोर्नोग्राफीसाठी मुलांचा वापर केला जात होता असेही म्हणता येणार नाही. या व्हिडिओमध्ये कोणतीही अश्लीलता नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT