पुण्यातल्या JSPM कॉलेजमधल्या सफाई कामगाराने केला २४ वर्षीय तरूणीचा विनयभंग

वाचा सविस्तर बातमी, नेमकी काय घडली घटना? वानवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
A 24-year-old girl was molested by a sweeper at JSPM College in Pune
A 24-year-old girl was molested by a sweeper at JSPM College in Pune(प्रातिनिधिक फोटो)

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमधील सफाई कामगाराने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय घडली घटना?

वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार,हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेजमधील फार्मसी विभागाच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या टॉयलेटमध्ये बुधवारी दुपारी सव्वा तीन वजनाच्या सुमारास एक 30 वर्षीय व्यक्ती साफसफाई करीत होता.तेवढ्यात 24 वर्षीय तरुणी तिथे जातच, साफ सफाई करणाऱ्या व्यक्तीने तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.त्यावर तिने त्याला विरोध करून तेथून पळ काढला आणि ही घटना तिने तिच्या सहकार्‍यांना सांगितली.त्यानंतर संबधीत तरुणीने आमच्याकडे तक्रार देताच,30 वर्षीय व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या तरुणीने आरोपीचे वर्णन सांगितले असून त्या आधारे शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in