चंद्रपूरमध्ये कॉल रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला तीन महिन्यापूर्वीचा खून, महिलेसह प्रियकराला अटक
विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूरमध्ये तीन महिन्यापूर्वी घडलेली एक खुनाची घटना मोबाइलवरच्या फोन रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आली आहे. पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवलं होतं. तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. हा प्रकार मोबाइल फोन रेकॉर्डिंगमुळे उघड झाला आहे. मृत माणसाच्या मुलीने केलेल्या तक्रारीनंत पोलिसांनी या प्रकरणातल्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये तीन महिन्यापूर्वी घडलेली एक खुनाची घटना मोबाइलवरच्या फोन रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आली आहे. पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवलं होतं. तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. हा प्रकार मोबाइल फोन रेकॉर्डिंगमुळे उघड झाला आहे. मृत माणसाच्या मुलीने केलेल्या तक्रारीनंत पोलिसांनी या प्रकरणातल्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारी एक घटना घडली आहे. चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी शहरात ही गटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका खुनाची उकल मोबाइलमधल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे झाली आहे. ५० वर्षांच्या एका महिलेने आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढला. ही हत्या झालीच नाही तर पतीला हार्ट अटॅक आला असा बनाव तिने रचला. मात्र तीन महिन्यापूर्वीची ऑडिओ क्लिप मिळाल्याने ती हत्या होती हे उघड झालं आहे.
६ ऑगस्टला काय घडली होती घटना?
६ ऑगस्टला ब्रह्मपुरी शहरातल्या गुरूदेव नगर भागात राहणारे श्याम रामटेके यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी रंजना यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना सांगितलं की तुमच्या वडिलांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला. दोन्ही मुली नागपूरमध्ये रहात होत्या. आईवर त्यांनी विश्वास ठेवल्या पारंपरिक पद्धतीने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता वडिलांच्या मृत्यूनंतर आई एकटी राहिल म्हणून एक मुलगी आईसोबत राहू लागली. मात्र तिने आईच्या वागणुकीत बदल झाल्याचं या काळात अनुभवलं.