'नायक नहीं खलनायक हूं...' गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक... - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / ‘नायक नहीं खलनायक हूं…’ गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक…
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

‘नायक नहीं खलनायक हूं…’ गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक…

a very shocking incident has happened in madhya pradesh where brother in law was brutally murdered sister in law

मुरार (मध्यप्रदेश): ‘नायक नही खलनायक हूँ मैं’ हे गाणं म्हणत दिराने (Brother-in-law) वहिनीची (Sister-in-law) चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. आरोपीचा साथीदार हा अल्पवयीन असल्याचे समजते आहे. दुसरीकडे महिलेचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे. (a very shocking incident has happened in madhya pradesh where brother in law was brutally murdered sister in law)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मुरार भागात राहणारी 35 वर्षीय महिला रेणू पाठक ही 17 एप्रिलपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी मुरार पोलिस ठाण्यात रेणू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान लोकांनी पोलिसांना सांगितले की, रेणूला तिचा दीर श्याम पाठकसोबत शेवटचे पाहिले होते. श्याम हा ट्रक चालक म्हणून काम करतो.

दिराने दिली खुनाची कबुली

पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो रेणूबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगत होता, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच रेणूचा खून केल्याची कबुली दिली. तसेच या खून प्रकरणात दोन मित्र एक राजू उर्फ ​​कुअंर आणि एका अल्पवयीन मित्राचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले. श्यामच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या अल्पवयीन साथीदाराला दतिया जिल्ह्यातील लॉन्च स्टेशन परिसरातून पकडले.

वहिनीला ट्रकमध्ये बसवलं अन्..

मुरार पोलीस ठाण्याचे प्रभारी संजीव नयन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू पाठक हिच्या हत्येचा आरोप हा दीर श्याम पाठकसह राजू आणि अन्य एक अल्पवयीन मुलावर आहे. रिमांडमध्ये श्याम आणि अल्पवयीन आरोपीने सांगितले की, 17 एप्रिलला आम्ही ट्रक घेऊन बडागाव येथे पोहोचलो. रेणू आमच्यासाठी जेवण घेऊन बडागावला आली होती.

हे ही वाचा >> Kiren Rijju, Arjun Ram Meghwal : PM मोदींचा पुन्हा धक्का, दिग्गज मंत्र्याचं खातंच काढलं

अल्पवयीन आरोपीच्या म्हणण्यानुसार, ‘रेणूला पाहताच श्यामने ट्रकमध्ये ‘आज तुम पर प्यार आया है’ हे गाणे वाजवण्यास केली. त्यानंतर रेणूही ट्रकमध्ये बसली. मग श्यामने सॅड साँग वाजवायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही ग्वाल्हेर-झांसी हायवेवरील डबरा शहरातून पुढे जात होतो तेव्हा श्यामने ‘खलनायक’ चित्रपटातील ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’ हे गाणे वाजवण्यास सुरुवात केली.’

‘खलनायक हूं मैं’ गाणे गात चाकू केला हल्ला

यानंतर अचानक श्यामने हातात चाकू घेतला आणि रेणूवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. ते गाणे गात असताना तो रेणूवर एकामागून एक वार करत होता. तो बराच वेळ चाकूने तिच्यावर वार करतच होता. एवढ्याने देखील त्याचे समाधान न झाल्याने त्याने रेणूचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ट्रकमध्येच ठेवला. जेव्हा आम्ही झाशी-ललितपूर महामार्गाने बबिना येथे पोहोचले तेव्हा त्याने पुलावरून रेणूचा मृतदेह बेतवा नदीत फेकून दिला. मग आम्ही बडोद्याला गेलो. पण, त्यानंतर पोलीस आपल्याला शोधत असल्याचं मला समजलं, म्हणून मी बडोद्याहून पळून दतियाला आलो.

हे ही वाचा >> लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…

रेणू जादूटोणा करत असल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान रेणूची हत्या ही जादूटोणा आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून करण्यात आली. दीर श्यामच्या म्हणण्यानुसार, त्याचा मोठा भाऊही ट्रकचालक होता. पण 5 वर्षांपूर्वी भावाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून वहिनी आमच्यासोबत राहू लागली होती. काही काळापासून माझी प्रकृती अचानक बिघडू लागली होती. मला शंका होती की, वहिनी जादूटोणा करते. तसेच, तिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. म्हणूनच मी तिला ठार मारलं.

ट्रक केला साफ

या प्रकरणाची माहिती देताना ग्वाल्हेरचे एसपी राजेश सिंह चंदेल म्हणाले की, मुरार पोलिसांनी आरोपीचा ट्रक ताब्यात घेतला आहे. श्यामने ट्रक पूर्णपणे साफ केला. त्यामुळे तपासासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे. खून प्रकरण महिनाभर जुने आहे. रेणूचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही, त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणखी एकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’