गर्भवती वहिनीवर जडलं प्रेम, माहेरी जायला निघाल्यामुळे गळा आवळून केली हत्या

मुंबई तक

मुंबईच्या कुर्ला भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दीराने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती वहिनीची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी दिराचं वहिनीवर प्रेम जडंलं होतं आणि वहिनी माहेरी जायला निघाल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सोनकर हा व्यक्ती आपली 20 वर्षीय पत्नी कोमलसोबत कुर्ला भागात राहत होता. संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या कुर्ला भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दीराने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती वहिनीची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी दिराचं वहिनीवर प्रेम जडंलं होतं आणि वहिनी माहेरी जायला निघाल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सोनकर हा व्यक्ती आपली 20 वर्षीय पत्नी कोमलसोबत कुर्ला भागात राहत होता. संजय आणि त्याचा मामेभाऊ अर्जुन हे कॉटन ग्रीन भागात एका चहाच्या दुकानात कामाला होते. अर्जुनही संजय आणि आपल्या वहिनीसोबत रहायचा. याच दरम्यान अर्जुनचं आपली वहिनी कोमलवर प्रेम जडलं होतं.

Crime: 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, बीड जिल्हा पुन्हा हादरला

गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी अर्जुन दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान घरी आला आणि काही वेळातच निघून गेला. थोड्यावेळाने शेजारील महिलांनी सोनकर यांच्या घरातून आवाज येत नसल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना कोमल जमिनीवर पडलेली पहायला मिळाली. कोमलच्या तोंडातून रक्त येत होतं. यानंतर शेजारील व्यक्तींनी कुर्ला पोलिसांना याची माहिती देत अर्जुनबद्दलही सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp