‘तुला आज ठोकून टाकतो’, माजी नगरसेवक कुणाल पाटील, पंढरीनाथ फडकेंसह 32 जणांवर मोक्का
बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून अंबरनाथमध्ये दोन गटात वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर थेट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ फडके यांच्यासह काही आरोपींना अटक केलेली आहे. इतरांचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील 32 आरोपींविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999) लावण्यात आलाय. यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक कुणाल पाटील, पंढरीनाथ फडके यांचाही समावेश […]
ADVERTISEMENT

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून अंबरनाथमध्ये दोन गटात वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर थेट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पंढरीनाथ फडके यांच्यासह काही आरोपींना अटक केलेली आहे. इतरांचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील 32 आरोपींविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999) लावण्यात आलाय. यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक कुणाल पाटील, पंढरीनाथ फडके यांचाही समावेश आहे.
13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता बोहनोली गावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चर्चेसाठी राहुल पाटील (रा.अडिवली, कल्याण) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून जात होते.
त्यावेळी सुदामा हॉटेल व अंबरनाथ एमआयडीसी कार्यालयासमोर रोडच्या कट्ट्यावर आरोपी गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके, मंगेश पंढरीनाथ फडके, मिलन अण्णा पालकर, राजेश कातारा, संदेश उर्फ पप्या फडके, केतन देशमुख, समीर कुटले, दर्शन पाटील, प्रशांत फडके यांच्यासह इतर आरोपींनी त्यांची वाहनं अडवली.
मंगेश फडके, गुरूनाथ फडकेंनी पिस्तूल रोखत दिली धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वाहनं अडवल्यानंतर मंगेश पंढरीनाथ फडके, गुरूनाथ पंढरीनाथ फडके यांनी राहुल पाटील यांना धमकी दिली. ‘तू कुणाल पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला कसा उभा राहतो? तुला आज ठोकून टाकतो. येथे कुणाल पाटील, अनिल पाटील व मयूर पाटील हे सुद्धा येणार आहेत”, असं आरोपी म्हणाले.