Crime News : बेडरुमध्ये सुनेला बघून संतापलेल्या सासूने गोळीच घातली, कारण…

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये रागाच्या भरात सासूने सुनेला संपवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केलीये. यात मयत विवाहितेचा पती, सासऱ्यालाही अटक झालीये.

ADVERTISEMENT

UP Murder News: Due to status difference and not doing domestic work in Amroha, UP, the mother-in-law shot and killed her daughter-in-law in the head.
UP Murder News: Due to status difference and not doing domestic work in Amroha, UP, the mother-in-law shot and killed her daughter-in-law in the head.
social share
google news

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतच असं आपण म्हणतो. अनेक घरात हे वाद असतात सासू-सूनेमध्ये. त्याची कारणं वेगळी असतात, पण या घटनेत सासूने सुनेला थेट गोळ्याच घातल्या. घटनेमागचं कारणही समोर आलंय आणि पोलिसांनी हत्या करणाऱ्या सासूसह सासऱ्याला आणि पतीलाही अटक केली आहे.

ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये. रागाच्या भरात सासूने सुनेला संपवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केलीये. यात मयत विवाहितेचा पती, सासऱ्यालाही अटक झालीये. तिघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंत सून अन्… आता प्रकरण समजून घ्या…

हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव कोमल आहे. कोमलचे लग्न औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजरौला येथे झाले होते. कोमलचे आईवडिल श्रीमंत आहे. वडिलांकडच्या श्रीमंतीमुळे कोमल लग्नानंतर सासरच्या घरात काम करत नव्हती, असा आरोप आहे.

दुसरीकडे कोमलची सासू हुंड्याची मागणी करत होती आणि त्यावरून वारंवार भांडणे होत होती, असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांचा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp