Pradeep Kurulkar : हनीट्रॅपमध्ये अडकलेले कुरूळकर RSS च्या शाखेत जायचे का?

हर्षदा परब

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुळकरांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपांनंतर न्यायालायने त्यांना 9 मे पर्यंत ATS च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

DRDO scientist arrested : charges against Pradeep Kurulkar is espionage and wrongful communication with Pakistan-based operatives.
DRDO scientist arrested : charges against Pradeep Kurulkar is espionage and wrongful communication with Pakistan-based operatives.
social share
google news

पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुळकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5 मेला अटक केली. पाकिस्तानला व्हाट्सअॅ्पवरून कॉल आणि मॅसेजवरून गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुळकरांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपांनंतर न्यायालायने त्यांना 9 मे पर्यंत ATS च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान कुरुळकर पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. डॉ. कुरुळकर यांच्यावर काय आरोप आहेत, आणि त्यांना का अटक केली आहे?

संरक्षण संशोधन संस्थेच्या म्हणजेच DRDO च्या संचालक पदावर काम करत असलेले डॉ. प्रदीप कुरुळकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुळकर यांना हनी ट्रॅप अडकवलं होतं. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला. त्या वेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आलं होतं. चौकशीत कुरुळकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाइल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आला. कुरुळकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले, तसेच ते कोणाच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यात येतोय.

drdo scientist : असं घडलं कुरुळकर प्रकरण

कुरुळकर हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन दहशतवादी विरोधी पथकाने संचालकांवर कारवाई केली आणि त्यांना 5 मेला अटक केलं.

डॉ. कुरुळकरांनी DRDO च्या पुणे येथील कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह च्या हस्तकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरुन व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात केल्याची माहिती ATS ला मिळाली होती. त्यासोबत डि. आर. डी. ओ. चे शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp