Mumbai Crime : मुंबई गँगवारने हादरली! चुनाभट्टी परिसरात अंदाधूंद गोळीबार; एक ठार, तीन जखमी
मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दिवसाढवळ्या 16 वेळा फायरिंग झाल्याने मुंबई पुन्हा एकदा गँगवारन हादरल्याचे दिसून आले. या गोळीबारामध्ये एका गुंडाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघ गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले

Chunabhatti Firing: मुंबईतील चुनाभट्टी येथील आझाद गल्लीमध्ये दिवसाढवळ्या 16 वेळा गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या गोळीबारामध्ये एक जण ठार झाला असून तिघं जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारच्या घटनेमुळे मुंबईतील गँगवॉरने (Gangwar) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे का असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून 16 वेळा गोळीबार (Firing) करण्यात आला असून त्यामध्ये सुमित येरुणकरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गर्दीत केला गोळीबार
चुनाभट्टीमधील आझाद गल्लीमध्ये नेहमीच वर्दळ असते, तरीही आझाद गल्लीतील त्या चिंचोळ्या परिसरात दुपारी दोघांनी गोळीबार करून एकाला ठार करून तिघं जण गंभीर जखमी झाले आहेत. सोळा वेळा फायरिंग केल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Ad Hock Committee : अब दंगल होगा! WFI च्या बरखास्तीनंतर नेमली ॲड हॉक कमिटी
तुरुंगातून आला होता सुटून
या घटनेची माहिती सांगताना पोलिसांनी स्पष्ट केले की झालेला गोळीबार हा वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगितले आहे. ज्या सुमित येरुणकरचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्याचा अनेक जणांबरोबर वाद होता. तसेच त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पूर्ववैमनन्यस्यातून हल्ला
सुमित येरुणकरवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सुमित हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. आज दुपारी चुनाभट्टीतील आझाद गल्लीत सोळा वेळा फायरिंग केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 16 वेळा फायरिंग झाल्याचे नेमकं कारण अजून समजलं नसलं तरी वैयक्तिक आणि पूर्ववैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.










