धुळ्यात लव्ह जिहाद? 'श्रद्धाचे 35 तुकडे झाले, तुझे 70 तुकडे करेन'; हर्षल निघाला अर्शद मलिक

पीडित महिलेने मध्यरात्री दिली पोलिसांत तक्रार, जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप आणि आरोपी पतीसह त्याच्या पित्यानेही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप
धुळ्यात लव्ह जिहाद? 'श्रद्धाचे 35 तुकडे झाले, तुझे 70 तुकडे करेन'; हर्षल निघाला अर्शद मलिक

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभरात पोहोचलंय. वसईच्या श्रद्धा वालकरची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने दिल्लीतल्या फ्लॅटवर हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. अशाच पद्धतीने मारण्याची आणि 70 तुकडे करण्याची धमकी धुळ्यातील महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने दिलीये. धक्कादायक बाब म्हणजे हर्षल माळी म्हणून स्वतःची ओळख सांगणारा तरुण अर्शद सलीम मलिक असल्याचं कळल्यानंतर महिलेला धक्काच बसला.

'श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले गेले, तू माझ्याविरुद्ध गेली, तर मी तुझे 70 तुकडे करेन', अशी धमकी लिव्ह-इन पार्टनर दिल्याची फिर्याद धुळ्यातील एका महिलेनं पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात मध्यरात्री दिलीये.

जंगलात नेऊन बलात्कार, व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल

पीडित महिलेनं बुधवारी (30 नोव्हेंबर) मध्यरात्री दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता अर्शद सलीम मलिक नावाच्या व्यक्तीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहते. तरुणाने 29 नोव्हेंबर रोजी तिला 70 तुकडे करण्याची धमकी दिली.

धुळ्यात लव्ह जिहाद? 'श्रद्धाचे 35 तुकडे झाले, तुझे 70 तुकडे करेन'; हर्षल निघाला अर्शद मलिक
Shraddha Walker Murder : श्रद्धाची हत्या लग्नाच्या तगाद्यामुळे नाही, तर...; समोर आलं धक्कादायक कारण

धुळ्यात लव्ह जिहाद... प्रकरण नेमकं काय?

पीडिता आणि आरोपी जुलै 2022 पासून एकत्र राहतात. त्याआधी 4 एप्रिल 2016 रोजी पीडित महिलेचं पहिलं लग्न झालं होतं. तिला पहिल्या पतीपासून 2017 मध्ये मुलगा झाला. 2019 मध्ये तिच्या पतीचे अपघाती निधन झाले.

पीडित महिलेची एका अकॅडमीत हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन अत्याचार केले. अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनवला आणि तिला धमकावलं. नंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

धुळ्यात लव्ह जिहाद? 'श्रद्धाचे 35 तुकडे झाले, तुझे 70 तुकडे करेन'; हर्षल निघाला अर्शद मलिक
Shraddha Walker Murder : श्रद्धाचं वडिलांसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं?

प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले अन् कळलं की हर्षल अर्शद आहे...

ते दोघं जुलै 2021 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. त्यावेळी पीडितेला कळलं की, हर्षल माळीचं खरं नाव अर्शद सलीम मलिक आहे. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटवर नेले.

पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे की, 'अर्शदने आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि या आरोपीच्या पित्यानेही आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले', असे पीडितेने फिर्यादीत म्हटलंय.

चार महिन्यांनी अर्शदने पीडितेला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. 26 ऑगस्ट 2022 रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून म्हणजे लिव्ह-इन मध्ये राहत असलेल्या तरुणाच्या बापाकडून अनैसर्गिक अत्याचार सुरूच होते.

पीडितेनं म्हटलंय की, 'अर्शदने पीडितेचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त 35 तुकडे केले गेले, तुझे आम्ही 70 तुकडे करू, अशी धमकी त्याने दिली', असं पीडितेने तक्रारीत म्हटलंय.

धुळ्यात लव्ह जिहाद? 'श्रद्धाचे 35 तुकडे झाले, तुझे 70 तुकडे करेन'; हर्षल निघाला अर्शद मलिक
Parbhani Crime : गाढ झोपलेल्या पत्नीचं मुंडकं छाटलं, शिर हातात घेऊन पती गावभर फिरला!

पीडितेला दिले सायलन्सरचे चटके...

'उस्मानाबाद येथे असताना सोन्याची पोत मोडण्यास नकार दिल्याने अर्शदने आपल्याला सायलन्सरचे चटके दिले होते', असेही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी आरोपी अर्शद सलीम मलिक आणि सलीम मलिक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in