गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागपूर हत्यांच्या घटनांनी हादरलं २४ तासात तीन हत्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर हत्यांच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. चोवीस तासात नागपुरात तीन हत्यांच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे..

पहिली हत्या कुठे घडली?

पहिली हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे.पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी सुनील भजे या इसमाची हत्या केली. महत्वाचे म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी अटक केली आहे.

हत्येची दुसरी घटना नागपूरच्या इमामवाडा भागात

दुसरी हत्येची घटना नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली,त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. तर तिसरी घटना पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यातील हत्येची पहिली घटना इमामवाडा भागात घडली रामसिंग ठाकूर असे मृतक इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर हत्येची दुसरी घटनाही पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.काल रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोशनचा मृत्यू झाला आहे.  आरोपी वीरेंद्र. यशोदास आणि अश्विन या तिघांसोबत रोशनचा तिघांसोबत वाद सुरू होता. त्याच वादातून  तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

हत्येची तिसरी घटनाही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT