Govt Job: फक्त एक मुलाखत अन् थेट प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट व्हा... 'या' सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये निघाली भरती!

मुंबई तक

राष्ट्रीय जैववैद्यकीय जीनोमिक्स संस्था म्हणजेच राष्ट्रीय National Institute of Biomedical Genomics (NIBMG) कडून प्रोजेक्ट रिसर्च साइंटिस्ट-II पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

'या' सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये निघाली भरती!
'या' सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये निघाली भरती! (AI फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फक्त एक मुलाखत अन् थेट प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट व्हा...

point

'या' सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये निघाली भरती!

Govt Job: सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय जैववैद्यकीय जीनोमिक्स संस्था म्हणजेच राष्ट्रीय National Institute of Biomedical Genomics (NIBMG) कडून प्रोजेक्ट रिसर्च साइंटिस्ट-II पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

काय आहे पात्रता? 

या भरतीअंतर्गत, उमेदवारांची नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाईल. सुरुवातीची नियुक्ती एका वर्षासाठी असेल, जी उमेदवाराच्या कामगिरी तसेच प्रकल्पाच्या आवश्यकतांनुसार वाढवली जाऊ शकते. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात ग्रॅज्युएशनची डिग्री असण्यासोबत त्या क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. याव्यतिरित्, पीएचडी पदवीधारक किंवा चार वर्षांच्या इंजीनिअरिंग डिग्रीसह संबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरले जातील. 

हे ही वाचा: चंद्रपूर हादरलं! पत्नीला घरात जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून पसार... उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

कशी होणार निवड? 

तसेच, NIBMG या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व पात्र उमेदवार कोणतंही शुल्क भरल्याशिवाय, ईमेलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा देखील आयोजित केली जाणार नाही. केवळ ऑनलाइन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही मुलाखत Microsoft Teams प्लॅफॉर्मवर आयोजित केली जाणार असून अर्जाद्वारे शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून याची माहिती दिली जाईल. 

हे ही वाचा: शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपने केला टप्प्यात कार्यक्रम.. अंबरनाथमध्ये काय-काय घडलं? क्रोनोलॉजी घ्या समजून.. तुम्हीही जाल चक्रावून!

संबंधित पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,000 रुपये वेतन दिलं जाईल. यासोबतच, एकूण वेतावर उमेदवारांना 10 टक्के HRA ची सुविधा देखील दिली जाईल. या भरतीसाठी उमेदवार आपला अपडेटेड CV ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतात. उमेदवार amaitra.nibmg@gmail.com या वेबसाइटवर 20 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपला CV पाठवू शकतात. यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून ऑनलाइन इंटव्ह्यूची माहिती दिली जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp